झाडालाच राखी बांधून दिले जाते पर्यावरण रक्षणाचे धडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:56 PM2019-08-03T12:56:57+5:302019-08-03T13:01:18+5:30

माझी प्रयोगशील शाळा...शिक्षणाचा सोलापुरी पॅटर्न...सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल; आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन

The tree itself is protected by environmental protection lessons! | झाडालाच राखी बांधून दिले जाते पर्यावरण रक्षणाचे धडे !

झाडालाच राखी बांधून दिले जाते पर्यावरण रक्षणाचे धडे !

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनशाळा आधुनिक जगताच्या प्रत्येक स्पर्धेत पाय रोवून उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे एक केंद्रयेत्या काळात देशाचे नेतृत्व करणाºया पिढीला हे धडे दिल्यास भावी आयुष्यात पर्यावरणाच्या ºहासामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात

सोलापूर : जागतिक तापमान वाढीमुळे जीवनसृष्टीला नुकसान पोहोचत आहे. या धोक्यापासून वाचण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज आहे. येत्या काळात देशाचे नेतृत्व करणाºया पिढीला हे धडे दिल्यास भावी आयुष्यात पर्यावरणाच्या ºहासामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. हा धडा विद्यार्थ्यांनी देऊन इतक्यावर न थांबता झाडाला राखी बांधून त्याचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थी घेतात. सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रयोगशील उपक्रम घेण्यात येतो. 

झाडाला बांधण्यात येणारी मोठी राखी हा विद्यार्थीच तयार करतात. रक्षाबंधन उत्सवाच्या दिवशी ही राखी शाळा तसेच विद्यार्थी राहत असलेल्या घराच्या परिसरातील झाडांना बांधली जाते. बांधलेल्या झाडाचे शेवटपर्यंत रक्षण करण्याचा पक्का निर्धार विद्यार्थी यावेळी करतात. रक्षाबंधन या पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देऊन वृक्षांचे संगोपन करण्याचा धडा विद्यार्थ्यांना दिला जातो. आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करण्यात येते. यावेळी विद्यार्थी अभंग वाचन करणे, भाषणातून संतांची माहिती देणे यासारखे उपक्रम घेण्यात येतात. 

देशाचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांना कळावा व तो त्यांच्या मनात रुजावा, यासाठी लोकमान्य टिळक जयंती, सुभाषचंद्र बोस जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, बालिका दिन, बाल दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा गांधी जयंती आदी कार्यक्रमांद्वारे त्या महान नेत्यांच्या कार्याचा आढावा साजरे करण्यात येतात. या उपक्रमाला सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, सदस्य डॉ. राजशेखर येळीकर, विश्वनाथ बºहाणपुरे, गुरुराज माळगे, भीमाशंकर पटणे, गंगाधर कुमठेकर, शिक्षण समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा, पर्यवेक्षक बिराजदार यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य असते.

पुस्तकाच्या गावास भेट
- विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. वाचनामुळे वाचा आणि मन दोन्ही समृद्ध होतात, याची जाणीव मुलांना होते. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी वाचनासाठी एक स्वतंत्र तासिका विद्यार्थ्यांसाठी नेमून दिली आहे, ज्यात विद्यार्थी स्वत: विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतात. या विचारांतर्गत शाळेची शैक्षणिक सहल यावर्षी भिलार या पुस्तकाच्या गावास नेण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाचे महत्त्व कळते. आपणही अशा पुस्तकांचा संग्रह करावा, अशी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळते. 

 शाळा आधुनिक जगताच्या प्रत्येक स्पर्धेत पाय रोवून उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे एक केंद्र आहे. जिथे संस्कार, ज्ञान आणि स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठीचा आत्मविश्वास या गोष्टी गुरूजनांकडून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होत असतात. विद्यार्थी घडविण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. 
 -धनंजय शिरूर, मुख्याध्यापक, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल. 

Web Title: The tree itself is protected by environmental protection lessons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.