राज्य राखीव पोलीस दलातील जवानांनी केले ट्रेकिंग अन् स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:54 PM2020-02-27T12:54:33+5:302020-02-27T12:57:05+5:30
सशक्त, सक्षम आणि स्मार्ट पोलीस उपक्रम; नळदुर्ग किल्ला केला सर
सोलापूर : येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० सोलापूर येथील ६ पोलीस अधिकारी व ७४ जवांनानी नळदुर्ग किल्ला (जि़ उस्मानाबाद) येथे जाऊन ट्रेकिंग करून स्वच्छता अभियान राबविले.
अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेतून राज्य राखीव पोलीस बलाचा ६ मार्च रोजी होणाºया वर्धापन दिनानिमित्त सशक्त, सक्षम आणि स्मार्ट पोलीस उद्दिष्टांतर्गत पोलीस अधिकारी, जवानांची तंदुरुस्ती वाढावी आणि ते कोणत्याही कर्तव्यासाठी नियमितपणे सक्षम रहावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक वारसा असणारे गडकिल्ल्यांचे ट्रेकिंग करण्याचे आयोजित केले होते. त्यानुसार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १०, सोलापूर येथील ६ पोलीस अधिकारी व ७४ जवानांनी नळदुर्ग किल्ल्यावर ट्रेकिंग करून स्वच्छता अभियान राबविले.
या उपक्रमास समादेशक रामचंद्र केंडे, सविता केंडे, पोलीस निरीक्षक एऩ व्ही़ मासाळ, एल़ टी़ रजपूत, पोलीस उपनिरीक्षक एस़ एऩ अवचार, एस़ एच़ क्षीरसागर, एस. एम. गायकवाड व शालेय विद्यार्थी उपस्थित होते़