५०० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून सुधाकरपंतांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:00+5:302021-08-25T04:28:00+5:30

स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यात ...

Tribute to Sudhakar Pant through cataract surgery of 500 patients | ५०० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून सुधाकरपंतांना श्रद्धांजली

५०० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून सुधाकरपंतांना श्रद्धांजली

Next

स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यात नऊ ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. याप्रसंगी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख, पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर, कासेगावच्या सरपंच सुनंदा भुसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ भोसले, जयसिंग देशमुख, मुकुंद राजोपाध्ये, दाजी भुसनर, दिनकर नाईकनवरे, बी. पी. रोंगे, हरीश गायकवाड, तानाजी वाघमोडे, दिलीप गुरव, प्रशांत देशमुख, दिनकर मोरे, बाळासाहेब यलमार, सुनील भोसले, बाळासाहेब शेख, सुभाष मस्के, दत्ता ताड आदी यावेळी उपस्थित होते.

पांडुरंग परिवार युवक आघाडी यांच्या वतीने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नेत्ररोग तज्ज्ञ आणि सर्व डॉक्टरांना कृतज्ञता पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख, डॉ. एकनाथ बोधले, प्रशांत देशमुख, हरीश गायकवाड, दाजी भुसनर, डॉ. बी. पी. रोंगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून कासेगाव येथेही नेत्र तपासणी शिबिर पार पडले.

---

दोन हजार रुग्णांची नेत्र तपासणी

राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती यांच्या सहकार्याने पंढरपूर तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकंबच्या ग्रामीण रुग्णालयात नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यामध्ये तब्बल दोन हजार रुग्णांची नेत्रतपासणी झाली, तर साधारणपणे ५०० रुग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. पुढील पंधरा दिवसांमध्ये या सर्व रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

---

Web Title: Tribute to Sudhakar Pant through cataract surgery of 500 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.