सोलापुरात हातपंपाला वाहिली श्रध्दांजली; ठाकरे सेनेचे अनोखे आंदोलन
By Appasaheb.patil | Published: March 23, 2024 04:08 PM2024-03-23T16:08:14+5:302024-03-23T16:08:39+5:30
सोलापूर शहरातील हातपंप दुरुस्तीच्या मक्तेदारांनी बिले वेळेवर मिळत असल्याने हातपंप दुरुस्तीच्या बाबतीत त्यांनी हातवर केले आहेत.
सोलापूर : सोलापुरात जलसंकट तीव्र झाले असताना महापालिकेकडून सोलापूर शहरातील हातपंपाची दुरुस्ती व देखभाल वेळेवर होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. ठाकरे सेनेने हातपंपाला श्रध्दांजली वाहून अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले.
दरम्यान, उजनी धरणात पाणीसाठा कमी असल्याने सोलापूरचा पाच दिवसांचा पाणीपुरवठा सात दिवसांवर गेला असताना नागरिक पाण्यासाठी वनवन भटकत आहेत, त्यातच सोलापूर शहरातील हातपंप दुरुस्तीच्या मक्तेदारांनी बिले वेळेवर मिळत असल्याने हातपंप दुरुस्तीच्या बाबतीत त्यांनी हातवर केले आहेत, त्यामुळे सोलापूर शहरातील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे नळाला पाणी येत नाही दुसरीकडे हातपंप बंद आहे, त्यामुळे शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर उत्तरच्या वतीने हातपंपाला पुष्पहार व फुले अर्पण करून नादुरुस्त हातपंपाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी हापसे त्वरित दुरुस्त न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला अभिषेक करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी शहर उपप्रमुख संदीप बेळमकर. योगेश कंठीमठ. नागराज कंदकुर. चंद्रकांत कंदकुर नागेश कंदकुर. विनोद हसबे. वाहिद पटवेकरी. अशोक कंदीकटला. आदी नागरिकव शिवसैनिक उपस्थित होते.