झेडपी पशुसंवर्धन सभापतीसह तिघांचा इर्टीगा कारवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:33+5:302021-03-28T04:21:33+5:30

भारत मोटे, गुलाब मोटे, सचिन केसकर, आबासो पुकळे (रा. घेरडी) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत भारत मोटे, गुलाब मोटे, ...

The trio, including the ZP Animal Husbandry Speaker, attacked the Irtiga car | झेडपी पशुसंवर्धन सभापतीसह तिघांचा इर्टीगा कारवर हल्ला

झेडपी पशुसंवर्धन सभापतीसह तिघांचा इर्टीगा कारवर हल्ला

Next

भारत मोटे, गुलाब मोटे, सचिन केसकर, आबासो पुकळे (रा. घेरडी) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत भारत मोटे, गुलाब मोटे, सचिन केसकर, आबासो पुकळे हे गुलाब मोटे यांना शिवीगाळी केल्याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार देऊन २६ मार्च रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी गावातील अहिल्या चौकात भारत मोटे यांच्या एमएच ०१ /सीएक्स ९२७१ या कारला भावकीतील व जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी त्यांची एमएच ४५/८६०१ ही एक्सयुव्ही ही गाडी रस्त्यात आडवी लावून भारत मोटे यांची गाडी थांबवली. गाडीतून उतरून तू आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे असे म्हणून हातातील तलवारीने कारवर मारण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या विलास माने व सुरेश बुरुंगले यांनी कुऱ्हाड, गज, तलवारीने कारची समोरील काच, बॉनेट, पाठीमागील काच, साईट लाम्प फोडले. हा प्रकार चालू असताना अनिल मोटे यांनी गजाने भारत मोटे यांच्या उजव्या दंडावर, गालावर, डाव्या कानाजवळ मारहाण केली. तर गुलाब मोटे यांनाही गजाने डाव्या हातावर मनगटाजवळ, डाव्या पायाजवळ मारहाण केली. सुरेश बुरुंगले यांनी सचिन केसकर यांना गजाने मारहाण केली. तर विलास माने आणि आबासो पुकळे यास त्याच गजाने मारहाण केली. यावेळी भावकीतील अंकुश मोटे, तानाजी उर्फ बंडू मोटे, प्रकाश मोटे, संजय पोळ, समाधान मोटे, दगडू पुकळे, जालू मोटे, तानाजी आलदर, अण्णासो उर्फ विजय मोटे, दिलीप मोटे, अनिल काकेकर, महेश खताळ, सचिन मोटे यांनी दुचाकीवरून भांडण व मारहाण करण्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवून चौघांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. याबाबत भारत बिरा मोटे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: The trio, including the ZP Animal Husbandry Speaker, attacked the Irtiga car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.