सोलापूरजवळील नाकाबंदीत मालट्रक घुसला; कोरोनायोद्ध्यांनी जीव वाचवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:01 PM2020-08-12T12:01:40+5:302020-08-12T12:03:34+5:30

नवीन हैदराबाद नाका येथील थरार; पोलिसांनी उड्या घेतल्या; शिक्षकही घाबरले 

A truck overturned in a blockade near Solapur; Coronaries saved lives | सोलापूरजवळील नाकाबंदीत मालट्रक घुसला; कोरोनायोद्ध्यांनी जीव वाचवला

सोलापूरजवळील नाकाबंदीत मालट्रक घुसला; कोरोनायोद्ध्यांनी जीव वाचवला

Next
ठळक मुद्देनाका-बंदी दरम्यान शहरात येणाºया चार चाकी वाहनांना अडवून त्यांची तपासणी केली जात होतीरस्त्याच्या कडेला आतील बाजूस पोलिसांना बसण्यासाठी मंडप व लोखंडी पत्र्याची रूम तयार करण्यात आले आहेतपासणीसाठी चार ते पाच पोलीस कर्मचारी रस्त्यावरच खुर्ची टाकून बसले होते

संताजी शिंदे 

सोलापूर: सोलापूरच्या दिशेने वेगात येणारा मालट्रक नवीन हैदराबाद नाका येथील बॉर्डर सीलिंग पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये घुसला. बॅरिकेड्स उडवत व मंडपाला घासत मालट्रक पुढे जाऊन थांबला, दरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी उड्या मारून आपला जीव वाचवला. हा थरार मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात येणाºया मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर बॉर्डर सील करण्यात आले असून, या ठिकाणी विशेष नाकाबंदी लावण्यात आली आहे. 

नवीन हैदराबाद नाका येथे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एक फौजदार, सहा पोलीस कर्मचारी, तालुका पोलिस स्टेशनचे दोन पोलिस कर्मचारी, चार होमगार्ड, एक शिक्षक व एक परिवहन विभागाचे कर्मचारी असे एकूण पंधरा जण कर्तव्यावर होते. नाका-बंदी दरम्यान शहरात येणाºया चार चाकी वाहनांना अडवून त्यांची तपासणी केली जात होती. रस्त्याच्या कडेला आतील बाजूस पोलिसांना बसण्यासाठी मंडप व लोखंडी पत्र्याची रूम तयार करण्यात आले आहे. तपासणीसाठी चार ते पाच पोलीस कर्मचारी रस्त्यावरच खुर्ची टाकून बसले होते. 

हैदराबाद रोडच्या दिशेने येणाºया मालट्रकचा अचानक मोठा प्रकाश पडला. मालट्रक (क्रं. एम एच १२ पी क्यू ८२९८) काही अंतरावर असलेल्या लोखंडी बॅरिकेड्सला धडकून खुर्चीवर बसलेल्या पोलिसांच्या दिशेने आली. पोलिसांनी रस्त्यावरून उड्या मारत मंडपाच्या दिशेने धाव घेतली. मालट्रक मंडपाच्या बांबूला धडकत सरळ निघून गेली, पुढे असलेल्या दुसºया लोखंडी बॅरिकेटला धडकली. एवढ्यावरही मालट्रक थांबली नाही ती वेगाने पुढे जात होती, मात्र लोखंडी बॅरिकेट्स ना खाली अडकल्यामुळे ट्रक चालकाला नाइलाजास्तव गाडी थांबवावी लागली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी लागलीच मालट्रकच्या पाठीमागे धावून चालकाला ताब्यात घेतले. चालक अवधूत लक्ष्मण बंडगर (वय 40 रा. सोलापूर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मालट्रक मंडपामध्ये घुसला असता तर मोठा अनर्थ झाला असता चालक अवधूत बंडगर हा सिमेंटचा माल घेऊन सोलापूरला येत होता. १४ चाकी टायर असलेला हा मोठा मालट्रक जर रस्त्याच्या कडेला असलेला लहान सिमेंटचा गार्डन सोडून मंडपामध्ये असला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मालट्रक मंडपाच्या बांबूला घासत पुढे गेला त्यामध्ये मंडपावर लावण्यात आलेले लाईटचे व दोन्ही लोखंडी बॅरिकेड्सचे नुकसान झाले. 

चालक म्हणाला, झोप लागली !

चालकाकडे चौकशी केली असता त्याने अचानक झोप लागली होती असे सांगितले. मंगळवारी पहाटेचा हा प्रकार अत्यंत भीतीदायक होता, कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी व अन्य कोविड वॉरियर्स घाबरले होते. सुदैवाने काही झालं नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील म्हणाले.

Web Title: A truck overturned in a blockade near Solapur; Coronaries saved lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.