दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रकने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:22+5:302020-12-05T04:48:22+5:30

भाजी विक्रेत्यांना उडवले; दोघे ठार सोलापूर : दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या नादात ‘नो एन्ट्री’मधून घुसलेल्या सिमेंटच्या ट्रकने भाजी विक्री करणारी ...

By truck rescuing two-wheelers | दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रकने

दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रकने

googlenewsNext

भाजी विक्रेत्यांना उडवले; दोघे ठार

सोलापूर : दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या नादात ‘नो एन्ट्री’मधून घुसलेल्या सिमेंटच्या ट्रकने भाजी विक्री करणारी महिला जुलेखा मुर्तूज शेख (वय ५०, रा. पडगाजीनगर, अक्कलकोट रोड) आणि मोहसिन मेहबूब पठाण (वय ३५, रा. बुलाभाई चौक, रविवार पेठ) या दुचाकीस्वाराला जोरात धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार उपचारादरम्यान मृत झाला. अन्य दोघे जखमी झाले आहेत. संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. काहीजण आग लावण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी जमावाला पांगविले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिमेंटच्या पोत्यांनी भरलेले ट्रक अक्कलकोटवरून सोलापूर शहरात येत असताना मल्लिकार्जून नगर येथे दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ट्रकचालकाने ट्रक डाव्या बाजूच्या भाजी विक्रीच्या ठिकाणी घुसला. तेव्हा जुलेखा शेख यांना जोरात धडक बसली. त्यांचा एका पाय मोडून गाडीच्या मागच्या चाकांमध्ये अडकला, तर दुसऱ्या पायाचे हाड मोडले. यातच त्यांचा मृत्यू झाला. सोबत दुचाकीवरील मोहसिन यांना गंभीर इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन क्रेनव्दारे ट्रकला तेथून बाहेर काढण्यात आले.

इन्फो बॉक्स

जड वाहतूक झालीच कशी?

सकाळी ८ नंतर जड वाहतुकीला बंदी असतानाही शहरात जडवाहतूक गाडी आलीच कशी, असा प्रश्न विचारत नागरिकांनी तेथे असलेल्या वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. सोबतच काही संतप्त लोकांनी ट्रकवर दगडफेक करत गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला पांगविल्याचे सांगण्यात आले.

Web Title: By truck rescuing two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.