ट्रक, टेम्पोच्या पार्किंगने व्हीआयपी रस्ता केवळ दुपदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:00 PM2019-07-03T15:00:41+5:302019-07-03T15:02:51+5:30

सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील रस्तेही मोकळा श्वास घेईनात

The trucks, tempo parking, VIP road only two-quarters | ट्रक, टेम्पोच्या पार्किंगने व्हीआयपी रस्ता केवळ दुपदरी

ट्रक, टेम्पोच्या पार्किंगने व्हीआयपी रस्ता केवळ दुपदरी

Next
ठळक मुद्देविमानतळ ते पार्क चौक हा व्हीआयपी समजला जाणारा चौपदरी मार्ग ट्रक, टेम्पो, कार पार्किंगने दुपदरी बनलायरस्त्याच्या कडेला जड वाहनांच्या थांब्यामुळे प्रमुख आणि जुन्या बाजारपेठांमधील रस्त्यांचा तर अक्षरश: जीव गुदमरतोय

सोलापूर : मोकळा श्वास घेणाºया रस्त्यांचे दर्शन इथे घडतेच कुठे? सर्वसामान्य सोलापूरकरांच्या या प्रश्नाचे उत्तर आजतागायत मिळाले नाही. विमानतळ ते पार्क चौक हा व्हीआयपी समजला जाणारा चौपदरी मार्ग ट्रक, टेम्पो, कार पार्किंगने दुपदरी बनलाय. रस्त्याच्या कडेला जड वाहनांच्या थांब्यामुळे प्रमुख आणि जुन्या बाजारपेठांमधील रस्त्यांचा तर अक्षरश: जीव गुदमरतोय. सोमवारी ‘लोकमत चमू’ने केलेल्या आॅन दि स्पॉट रिपोर्टिंगवेळी ट्रक, टेम्पोचालकांनी वाहनतळ नसल्याने वाहने कुठे लावायची? असा प्रश्न उपस्थित केला.

दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी ‘लोकमत’ चमू विमानतळहून निघाला. तेथून आसरा चौकाच्या दिशेने येत असताना मजरेवाडीनजीक रस्त्यावरच एक खासगी बस रस्त्याच्या कडेला थांबली होेती. त्या भागातील काही लोकांना बोलते केले असता त्यांनी मुलतानी ते शिवशाहीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने थांबलेली असतात. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. आसरा चौक ते महावीर चौकापर्यंतच्या रस्त्याचा दोन्ही भाग कार पार्किंगने व्यापल्याचे चित्र चमूतील छायाचित्रकाराने आपल्या कॅमेºयात कैद केले. हेच चित्र पुढे गांधी नगर, सात रस्ता, डफरीन, पार्क आणि छत्रपती शिवाजी चौकापर्यंत नजरेत भरले. 

दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी चमू थेट भुसार गल्लीतील प्रमुख बाजारपेठेत पोहोचला. मंगळवारपेठ चौकी-भुसार गल्ली आणि पुढे कुंभार वेस या मार्गाच्या दोन्ही बाजूला टेम्पो थांबलेल्या होत्या. या मार्गावरून येणाºया-जाणाºया वाहनधारकांना तारेवरची कसरत करत यावे लागत होते. काही व्यापाºयांना बोलते केले असता त्यांनी ‘आमच्या दुकानी ट्रक, टेम्पोद्वारे माल येत असतो. तो माल उतरवून घेईपर्यंत वाहने दुकानांसमोरच थांबवून घ्यावी लागतात. माल रिकामा केल्यावर ती वाहने तेथेच थांबतात. यावर महापालिका आणि संबंधित पोलीस खात्याने पर्याय शोधावा’ असा सूर आळवला. मंगळवार पेठ पोलीस चौकी ते सराफ बाजार आणि पुढे मधला मारुती, मधला मारुती ते कोंतम चौक आणि टिळक चौक, टिळक चौक ते बाळीवेस, मधला मारुती ते माणिक चौक आणि पुढे विजापूर वेस हे सर्वच मार्ग कार, रिक्षा, टेम्पो, ट्रकने व्यापलेले दिसले.

जयभवानी प्रशालेच्या मैदानाचा पर्याय
- कुंभार वेस, भुसार गल्ली, सराफ बाजार, चाटी गल्ली, माणिक चौक, कोंतम चौक, बाळी वेसचा परिसर जुना बाजारपेठांचा म्हणून परिचित आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर इतर जिल्हे आणि परप्रांतातील व्यापारी बाजारपेठांत येत असतात. इतर जिल्ह्यांतून अथवा परराज्यांतून आलेला माल ट्रकद्वारे बाजारपेठांमधील व्यापाºयांच्या दुकानात, गोदामात उतरविला जातो. माल उतरविल्यानंतर ट्रक, टेम्पो इथला माल घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. तोपर्यंत ही वाहने थांबवायची कुठे? असा प्रश्न पडतो. यासाठी या बाजारपेठांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जयभवानी प्रशालेच्या मैदानावर वाहनतळाचा पर्याय होऊ शकतो, अशी सूचना काही व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. 

जोडभावी पेठेत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय, राज्यस्तरावरील माल वाहतूक करणाºया कंपन्या (ट्रान्स्पोर्ट) आहेत. या कंपन्यांना ट्रक पुरवणारे एजंटही आहेत. अनेक ट्रकचालक मालाच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्यासाठी वाहनतळांची सोय नाही. महापालिकेने वाहनतळांची सोय करावी.
-रोशन भुतडा, व्यापारी.

Web Title: The trucks, tempo parking, VIP road only two-quarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.