सरपंच निवडीचे बिगुल वाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:11+5:302021-02-06T04:39:11+5:30
पहिल्या टप्प्यात ९ फेबुवारी रोजी तालुक्यातील तिसंगी, सोनके, उंबरगाव, तनाळी, शिरगाव, खर्डी, तावशी, अनवली, कासेगाव, पोहरगाव, शंकरगाव-नळी, फुुलचिंचोली, जैनवाडी, ...
पहिल्या टप्प्यात ९ फेबुवारी रोजी तालुक्यातील तिसंगी, सोनके, उंबरगाव, तनाळी, शिरगाव, खर्डी, तावशी, अनवली, कासेगाव, पोहरगाव, शंकरगाव-नळी, फुुलचिंचोली, जैनवाडी, मगरवाडी, शेगाव दुमाला, नारायण चिंचोली, बाभुळगाव, आव्हे-तरटगाव, करकंब, उंबरेे, पेहे, भाळवणी, केेसकरवाडी, शेंडगेवाडी, उपरी, सुपली, पिराची कुरोली, पळशी, वाडीकुरोली, देवडे, शेवते, चिलाईवाडी, भोसे, सुगाव-भोसे, ओझेवाडी, नेपतगाव, गोपाळपूर, चळे, कोंढारकी, मुंडेवाडी, गादेगाव, शेळवे, वाखरी, शिरढोण, चिंचोली-भोसे, कौठाळी, खेडभाळवणी या ४७ या गावातील सरपंच पदाची निवड होणार आहे.
११ फेब्रुवारी रोजी बोहाळी, तपकिरी शेटफळ, सिद्धेवाडी-चिचुंबे-तरडगाव, एकलासपूर, खरसोळी, विटे, आंबे चिंचोली, तारापूर, भटुंबरे, देगाव, आढीव, नांदोरे, करोळे, सांगवी-बादलकोट, धोंडेवाडी, उजनी वसाहत, पटवर्धन कुरोली, रांझणी, सरकोली, भंडीशेगाव या २० गावांची सरपंच निवड होणार आहे.
१३ फेब्रुवारी रोजी सुस्ते, रोपळे, कान्हापुरी, आंबे, अजन्सोंड या ५ गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे.
याकरिता ४७ अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावांसाठी स्वतंत्र अध्यासी अधिकारी नेमून विशेष सभेचे आयोजन करत सरपंच, उपसरपंच निवड घ्यावी याबाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार दिनांक ९, ११ व १३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
वातावरण पुन्हा तापणार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर गेल्या महिन्याभरापासून पंढरपूर तालुक्यातील ७२ गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत पक्ष, गटा-तटांना बाजूला ठेवत नवीन समीकरणे जुळवत स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे अनेक गावात एकाच नेत्याचे दोन गट आमने-सामने उभे ठाकले होते. निवडून आलेले पॅनलही काही गावे वगळता एक-दोन उमेदवारांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंचपद निवडणुकीत घोडेबाजार रंगणार हे निश्चित आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर गेल्या १५ दिवसांपासून शांत असलेले गावागावातील राजकारण सरपंच निवडीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे पुन्हा तापणार आहे. सहलीवर गेलेले उमेदवार गावात कसे आणायचे, याच्या हालचाली सुरू आहेत. तर गावात असलेल्या उमेदवारांना कसे सांभाळायचे व सरपंच निवडी दिवशी कोणती रणनिती आखायची, याबाबत गावागावातील कार्यकर्ते, नेतेमंडळी कामाला लागले आहेत.