आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:13+5:302021-08-25T04:28:13+5:30
आर्थिक अडचणीत असलेल्या व शेतमालाला भाव नसलेल्या शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ वीज पुरवठा खंडित ...
आर्थिक अडचणीत असलेल्या व शेतमालाला भाव नसलेल्या शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ वीज पुरवठा खंडित केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्याचाच प्रत्यय म्हणून सोमवारी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमची शेती पंपाची खंडित केलेली वीज तत्काळ जोडा म्हणून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हलगी मोर्चा मोर्चा काढला.
यावेळी संबंधित वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी उद्धव जाधव यांना निवेदन देण्यात आले. मात्र, प्रतिसाद मिळला नाही. शेवटी ‘आम्ही तुम्हाला दहा मिनिटांचा वेळ देतो, तेवढ्या वेळेत तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वीज जोडणीचा आदेश न आल्यास आमच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेऊ, असे सांगितले. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून तो प्रकार थांबविला. तब्बल दोन ते अडीच तासांच्या या घडामोडीनंतर वीजपुरवठा तत्काळ सुरू करतो असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाधव यांना सांगताच शेतकऱ्यांनी जल्लोष केला.
----
आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नव्हतं
वीज वितरण कंपनीला आम्ही सर्व शेतकरी सहकार्य करण्यास तयार आहोत. आपण दिलेल्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येक शेती पंपाच्या वीज कनेक्शनला एक हजार रुपयेप्रमाणे शेतकरी आपापले डीपीवरील पैसे आपल्याकडे जमा करतील. तसेच आम्ही कुणालाही पेटविणार नव्हतो. मात्र, आमचं ऐकून घेतलं जात नव्हतं. त्यामुळे आम्ही शेतकरी स्वतः पेटवून घेऊन आत्महत्या करणार होतो, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
----