तुच सखा, तुच त्राता मानुनि घे देवा, मनोभावे घेतो दर्शन पायरीवरी माथा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:15+5:302021-03-13T04:40:15+5:30

अकलूजमध्ये शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरात अभिषेक व महापूजा आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व सत्यप्रभा देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पार पडली. ...

Tuch sakha, tuch trata manuni ghe deva, manobhave gheto darshan pyarivari matha! | तुच सखा, तुच त्राता मानुनि घे देवा, मनोभावे घेतो दर्शन पायरीवरी माथा!

तुच सखा, तुच त्राता मानुनि घे देवा, मनोभावे घेतो दर्शन पायरीवरी माथा!

googlenewsNext

अकलूजमध्ये शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरात अभिषेक व महापूजा आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व सत्यप्रभा देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पार पडली. मंदिर बंद असल्याने भाविकांनी पायरीवर माथा टेकत मनोभावे दर्शन घेतले. अकलुज शहरात महादेव मंदिर, बुर्जा चौकातील शिवकालीन महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले.

अक्कलकोटमध्ये एस. स्टँड जवळील ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर, सुभाष गल्लीतील बारा ज्योतिर्लिंग, स्वामी समर्थ मंदिर, ए वन चौकातील राजेराय मठ, बुधवार पेठेतील समाधी मठ, भारत गल्लीतील गुरु मंदिर, अक्कलकोट -सोलापूर रस्त्यावरील स्वामी समर्थ आश्रम मठ आणि शिवपुरी येथे दिवसभर कोरोनाचे नियम पाळून ‘श्रीं’चे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त पारंपरिक विधी पार पडला.

----

वाजत गाजत आल्या कावडी

सांगोला तालुक्यातील कटफळ येथील लांडा महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मंदिराबाहेरुनच दर्शनाची सोय करण्यात आली. डोंगरचढावर असलेल्या मंदिराभोवती गावोगावच्या कावडी वाजत गाजत दाखल झाल्या. पहाटेपासून दर्शनासाठी अंतर राखून हर हर महादेवाचा गजर करीत भक्तांनी दर्शन घेतले. शिवाजी पुजारी यांनी दिवसभरातील विधीसोहळे पार पाडले.

----

Web Title: Tuch sakha, tuch trata manuni ghe deva, manobhave gheto darshan pyarivari matha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.