कर्नाटकी भाविकांची तुळजापूरची वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:40 AM2019-10-12T11:40:23+5:302019-10-12T11:42:08+5:30
कोजागरी पाैिर्णमा विशेष; कर्नाटकातील अनेक भाविक आपल्या मुलाबाळांसह तुळजापूरकडे मार्गस्थ
सोलापूर : कोजागरी पाैिर्णमेला आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर जिल्हा आणि शेजारील कर्नाटकातील गावांमधील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरकडे निघाले असून, सोलापूर शहरातील भाविक उद्या सकाळपासून प्रस्थान ठेवणार आहेत.
कर्नाटकातील अनेक भाविक आपल्या मुलाबाळांसह तुळजापूरकडे मार्गस्थ होताना दिसून आले. विजयपूर आणि होटगी रस्त्यावरून या भाविकांचे जत्थे सकाळपासून मार्गस्थ होत होते. अनेक भाविकांनी सैफुल परिसरात दुपारचे भोजन घेतल्यानंतर विश्रांतीसाठी ते संभाजी तलावाच्या परिसरात आले. दुपारची विश्रांती झाल्यानंतर पुन्हा आई राजा उदो उदोचा गजर करत तुळजापूरकडे मार्गस्थ झाले. सोलापुरातील सामाजिक संस्था, रूग्णालयांकडून या भक्तांची सेवा केली जात आहे.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे तुळजापूरला पायी जाणाºया भक्तांना प्रसादाचे वाटप
सोलापूर : शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना आसरा सेंटर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाºया भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विजयपूर रोड येथील नेहरु नगरमध्ये संघटनेतर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान हा उपक्रम घेण्यात आला. भाविकांना शाबुदाण्याचा चिवडा, राजगिºयाचे लाडू, सफरचंद, बिस्कीट यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग मेढेगार, भीमाशंकर ढमामे,अंबादास शिंदे,श्रीकांत अरबळे, अशोक खरात, उमेश सातपुते, अरविंद नंदर्गी, अविनाश हंचाटे,नागेश कुंभार, रेवणसिद्ध ढमामे, शैलेश कोपा, नेताजी बंडगर, अमर खंदारे, प्रभाकर पोतदार, शशिकांत पाठक, मल्लिनाथ शाबादे व माजी नगरसेवक सिद्रामप्पा व्हनमोरे उपस्थित होते.
‘मार्कंडेय’तर्फे भाविकांसाठी मोफत तपासणी केंद्र
सोलापूर : श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातर्फे तुळजापूरला पायी जाणाºया भाविकांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तळेहिप्परगा येथे घेण्यात आलेल्या उपक्रमाचे रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील १३ वर्षांपासून तुळजापूरला पायी जाणाºया भाविकांसाठी हा उपक्रम रुग्णालयातर्फे घेण्यात येतो. उद्घाटनप्रसंगी रुग्णालयाचे उपाध्यक्ष मनोहर अन्नलदास, संचालक लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, अरुण गोगी, तिरुपती विडप, पार्वतय्या श्रीराम, काशिनाथ गड्डम, सरिता वडनाल, तळेहिप्परग्याचे माजी सरपंच राजू हौशेट्टी, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास गोसकी, स्वामी आकेन, डॉ. राजशेखर स्वामी, डॉ. भीमण्णा बदेल्ली, डॉ. ओंकार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.