पंढरीतील तुळशी वृंदावन भाविकांसाठी पुन्हा खुले, वन विभागाने केले होते बंद
By रवींद्र देशमुख | Published: January 9, 2024 07:21 PM2024-01-09T19:21:18+5:302024-01-09T19:21:29+5:30
संत चोखामेळा, संत एकनाथ महाराजांचे मंदिर कोसळल्यानंतर वन विभागाने केले होते तुळशी वृंदावन बंद
रवींद्र देशमुख
सोलापूर : पंढरपूर येथील तुळशी वृंदावनामधील संत चोखोबा आणि संत एकनाथ महाराज यांची मंदिरे पडली होती. यामुळे वन विभागाने खबरदारी घेत तुळशी वृंदावन भाविकांसाठी बंद ठेवले होते. तब्बल एक वर्षापासून बंद असलेले भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
शहरातील यमाई तलावाच्या शेजारी कोट्यावधी रुपये खर्चून तुळशी वृंदावन तयार करण्यात आले आहे. या तुळशी वृंदावनाचे सन २०१९ मध्ये तत्कालीन
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. तुळशी वृंदावनामुळे पंढरपूर शहराच्या वैभवात वाढ झाली आहे. तुळशी वृंदांमध्ये असलेल्या संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत नामदेव या प्रमुख संतांची मंदिरे पाहण्यासाठी पंढरीत आलेले भाविका आवर्जून जातात.
परंतु तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे संगमरवरी मंदिर मार्च महिन्यात अचानक कोसळले होते. त्याच वेळी श्री चोखामेळा यांचे वंशज सुनील सर्वगोड व ॲड कीर्तीपाल सर्वगोड यांनी सर्वच मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. अशी मागणी केली होती. परंतु वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते.
यानंतर आ. समाधान आवताडे यांनी वन विभागाकडून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात श्री संत एकनाथ महाराजांचे मंदिर ही कोसळले.
यावेळी ही आ. समाधान आवताडे यांनी सर्वच मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशा सूचना दिल्या होत्या. वन विभागाने खबरदारी म्हणून त्या परिसरात असलेल्या इतर संतांचे मंदिरे सोमवारी उतरवून घेतली आहेत. परंतु सर्व मंदिरे दुरुस्त करून पुन्हा व पूर्णबांधणी करून तुळशी वृंदावन भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले.