ग्रामपंचायत निवडणुकांवर अंधश्रद्धेचा पगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:18+5:302021-01-13T04:55:18+5:30
निवडणुका लोकशाहीचा पाया समजल्या जातात. यातून देशाचे नेतृत्व करणारी नवीन पिढी पुढे येत असते. तालुक्यात सध्या ४९ ग्रामपंचायतींचा निवडणूक ...
निवडणुका लोकशाहीचा पाया समजल्या जातात. यातून देशाचे नेतृत्व करणारी नवीन पिढी पुढे येत असते. तालुक्यात सध्या ४९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे गावगाड्यातील कारभारी व तरुणांकडून साम, दाम, दंड ही नीती निवडणुकीच्या आखाड्यात कितपत यशस्वी होईल, याची उघड-उघड गणिते मांडली जात आहेत. असे असले तरी भलीभली मंडळी पडद्याआडून अंधश्रद्धेचा डाव मांडताना दिसत आहेत.
असा होतो छू...मंतर
अंगारे-धुपारे यासह रात्री-अपरात्री कोंबडी व बोकडांचे बळी, लिंबू-मिरची अन् बिबे, काळ्या बाहुल्या काही ठिकाणी लटकताना दिसत आहेत. रात्रीच्या काळोखात अनेकांच्या घराजवळ दिवे, बाहुली, टाचण्या लावलेले लिंबू आशा वस्तू एकत्र करून तयार केलेले उतारे, नेते व कार्यकर्त्यांच्या खिशात अथवा गळ्यात दिसतात. भारलेले ताईत, मतदारांकडून ग्रामदैवताचे नावे गुलाल अथवा भंडारा मतदारांकडून उचलून घेतला जातो. मतांचा कौल अशा अनेक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये छू...मंतर होताना दिसत आहे.
कोट ::::::::::::::::::
आधुनिकतेच्या जमान्यात अंधश्रद्धेला थारा मिळणे ही बाब अशोभनीय आहे. अशा अंधश्रद्धेचा वापर करून राजनीती करणाऱ्या गावगाड्यातील लोकांची वैचारिक पातळी समाजासमोर येते. त्यामुळे मतदारांनी अशा व्यक्तींना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे.
- प्रा. आशोक भोसले
व्याख्याते, अंधश्रद्धा निर्मूलन