सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा देणाºया बस फेºया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:28 PM2019-07-17T12:28:42+5:302019-07-17T12:31:34+5:30
प्रवाशांचे हाल कायम; शहरातील गाड्या रिकाम्याच धावतात
सोलापूर : तोट्याचे कारण पुढे क़रून महापालिकेच्या परिवहन विभागाने ग्रामीण भागातील सिटी बसच्या फेºया बंद केल्या आहेत. सध्या केवळ शहरात बससेवा सुरू आहे. शहरात धावणाºया बसही रिकाम्या धावत असून, परिवहनला दररोज दीड लाख रुपयांचा फटका बसत असल्याचे परिवहन अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.
मनपा परिवहन विभागाची बस शहरासह परिसरातील ३० किमी अंतरावरील प्रमुख गावांमध्ये जात असते. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांना, विद्यार्थ्यांना या सेवेचा फायदा होतो. थकीत वेतनासाठी परिवहनच्या कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारला होता. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर पाच दिवसांपूर्वी संप मागे घेण्यात आला. पुन्हा सेवा सुरू केल्यानंतर केवळ शहरात बस सोडण्यात येत आहेत. शहरात धावणाºया अनेक बस रिकाम्याच धावत आहेत. परिवहन उपक्रमातील काही अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ४० बस सुरू आहेत.
या बसच्या माध्यमातून मागील महिन्यात परिवहनला दररोज दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. यात सर्वाधिक वाटा ग्रामीण भागाचा होता. आता शहरातील फेºया वाढल्या आहेत, पण दररोज ५० ते ६० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. मुळातच परिवहनला दररोज दोन लाख रुपयांचा तोटा होतो. त्यात नव्याने तोटा वाढल्यानंतर पुन्हा कर्मचाºयांच्या वेतनाचा आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च उभा राहणार आहे.
या गावातील सेवा बंद
- मंद्रुप, चपळगाव, जेऊर, कर्देहळ्ळी, मुस्ती, बोरामणी, कासेगाव, विंचूर, खडकी-धोत्री, पितापूर, वडगाव, मार्डी, नान्नज, वडाळा, बीबीदारफळ, मोहोळ.
ग्रामीण भागातील अनेक मार्ग तोट्यात चालवावे लागतात. परिवहनच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. पालकमंत्र्यांनीच ग्रामीण भागातील बससेवा बंद करा, असे आदेश दिले होते. या निर्णयाबाबत सर्व गटनेत्यांना कळविले. त्यांनी संमती दिल्यानंतरच सेवा बंद केली. शहरातील फेºया आणि ग्रामीण भागातील फेºयांमधून मिळणाºया उत्पन्नाची पडताळणी सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो.
- गणेश जाधव, सभापती, परिवहन समिती.
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे नेते त्यांच्या आलिशान गाड्यांमधून सोलापूरला येतात. या नेत्यांना सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थ्यांच्या अडचणीची जाणीव नाही. गेल्या २० दिवसांपासून आम्ही बस सुरू करा म्हणून पाठपुरावा करतोय, पण महापालिका दाद द्यायला तयार नाही. यातून अवैध प्रवासी वाहतुकीला प्राधान्य मिळते. रिक्षा, जीपचालक मनमानी करून पैसे घेतात. परिवहनने यावर फेरविचार करायला हवा
- जमीर शेख, शहर संघटक, प्रहार संघटना.