सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी ५९५ कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:14 PM2018-03-08T12:14:16+5:302018-03-08T12:14:16+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत साडेतीनशे कोटींची वाढ, सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल वाढली
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा लिलावातून ५९५ कोटी २२ लाख ४२ हजार ७०० रुपयांची उलाढाल झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही उलाढाल साडेतीनशे कोटीने अधिक आहे.
राज्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणा व अन्य बाजार समितीप्रमाणेच सोलापूर बाजार समितीमध्येही कांद्याची उलाढाल होते. दरवर्षी होणाºया या उलाढालीची आकडेवारी मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव(ब) व उमराणा बाजार समितीत कांद्याची उलाढाल सोलापूर बाजार समितीपेक्षा अधिक आहे. तरीही एकट्या सोलापूर बाजार समितीची उलाढाल एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत ५९५ कोटी २२ लाख ४२ हजार ७०० रुपये इतकी झाली आहे. मागील वर्षभरात अधिक कांदा विक्री होऊनही उलाढाल मात्र ३५५ कोटी रुपयाने कमी होती.
सरासरी दर २१०० रुपये राहिला
- २०१५-१६ यावर्षी क्विंटलला किमान ५० रुपये व कमान ७ हजार ४०० रुपये तर सर्वसाधारण १००० हजार रुपये व मागील वर्षी(१६-१७) किमान १०० रुपये व कमान २१०० रुपये तर सर्वसाधारण ५०० रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळाला होता. यावर्षी किमान ५० रुपये व कमान ५ हजार २५० रुपये तर सर्वसाधारण दर २१०० रुपये मिळाला आहे.
- - २०१५-१६ यावर्षी सोलापूर बाजार समितीमध्ये ४५ लाख ९६ हजार ७६५ क्विंटल कांद्याची विक्री झाली होती त्यातून ५३४ कोटी ४० लाख ५३ हजार रुपयांची उलाढाल झाली होती.
- - २०१६-१७ यावर्षी ४७ लाख २६ हजार ७६५ क्विंटल कांद्याची विक्री व त्यातून २४० कोटी १४ लाख ९४ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली होती.
- च्यावर्षी एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ११ महिन्यात ४३ लाख ८४ हजार ९३९ क्विंटलची विक्री व त्यातून ५९५ कोटी २२ लाख ४२ हजार ७०० रुपयांची उलाढाल झाली आहे.