शेळ्या-मेंढ्या विक्रीतून सात लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:59+5:302020-12-14T04:34:59+5:30
सांगोला येथील रविवार जनावरांचा आठवडा बाजार पश्चिम महाराष्ट्र जातिवंत खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी जातिवंत बैल, खोंड खरेदीसाठी मोठ्या ...
सांगोला येथील रविवार जनावरांचा आठवडा बाजार पश्चिम महाराष्ट्र जातिवंत खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी जातिवंत बैल, खोंड खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारात येतात. त्याचबरोबर या बाजारात जर्सी गाई, देशी, पंढरपुरी दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी पशुपालक अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे जनावरे, शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळते. मात्र कोरोना संसर्गजन्य आजारामुळे जनावरांचा बाजार आठ महिन्यांपासून बंद केला होता. मध्यंतरी एक आठवडा बाजार चालूही झाला. परंतु लम्पी स्किन डिसीज संसर्ग आजारामुळे पुन्हा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक रविवारी बाजारात होणारे जनावरे खरेदी-विक्रीचे होणारे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर, मुख्याधिकारी नगर परिषद सांगोला व पशुधन विकास आधिकारी, सांगोला यांनी लक्ष देऊन बंद केलेला जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी शेतकरी व्यापाऱ्यांनी केली आहे.