बारा हजाराची वाळू अन्‌ पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:11+5:302021-04-20T04:23:11+5:30

याबाबत सोलापूर गुन्हे विभागाचे सहायक फौजदार नीलकंठ जाधवर यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच चालक सयाजी ...

Twelve thousand worth of sand and five lakh worth of property confiscated | बारा हजाराची वाळू अन्‌ पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

बारा हजाराची वाळू अन्‌ पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Next

याबाबत सोलापूर गुन्हे विभागाचे सहायक फौजदार नीलकंठ जाधवर यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच चालक सयाजी मारुती गाडेकर (वय २७ रा. पानगाव) याच्याविरुद्ध भादंवि ३७९, पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ व १५ नुसार गुन्हा नोंदला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उंडेगावजवळील भोगावती नदीच्या पात्रातून कोणतीही शासकीय रॉयल्टी न भरता टेम्पो (डीएस १०८००४) २ ब्रास वाळू घेऊन विक्रीसाठी बार्शीकडे येत होता. त्यावेळी हे पथक पेट्रोलिंग करत या गावाजवळ येताच त्यास या पथकाने अडवले. महसूल विभागाचा परवाना नसल्याने पथकाने १२ हजार रुपयांच्या वाळूसह ५ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्यास ताब्यात घेतले.

ही कारवाई फौजदार अनिल पाटील, सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे, हवालदार प्रकाश कारटकर, केशव पर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस नाईक महेश डोंगरे करत आहेत.

Web Title: Twelve thousand worth of sand and five lakh worth of property confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.