सत्ताविसाव्या दिवशीही नागरिक साखळी उपोषणावर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:52+5:302021-07-19T04:15:52+5:30
अकलूज : राज्य शासनाने अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे या मागणीसाठी अकलूज येथील प्रांत ...
अकलूज : राज्य शासनाने अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे या मागणीसाठी अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या सत्ताविसाव्या दिवशीही नागरिक ठाम राहिले.
गेले २७ दिवस तिन्ही ग्रामपंचायतींचे नागरिक अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले आहेत. रविवारी उपोषणात माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, सरपंच पायल मोरे, सदस्या रेश्मा तांबोळी, रेश्मा गायकवाड, माजी सदस्य प्रतिभा गायकवाड, वसुंधरा देवडीकर, शमा जगताप, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे यांच्यासह शिवरत्न गणेश मंडळ, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, कापड असोसिएशन, तलाठी कार्यालय परिसर, जुना बाजारतळ परिसर येथील नागरिक सहभाग झाले होते.
यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. काल याचिकेच्या सुनावणीप्रसंगी शासनाच्या वतीने सरकारी वकिलांनी म्हणणे मांडून तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. मात्र, शासन जोपर्यंत मागणी मान्य करीत नाही तोवर नागरिक साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहेत.
180721\20210718_165820.jpg
अकलुज येथे साखळी उपोषणाप्रसंगी निवेदन देताना माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील,सरपंच पायल मोरे व इतर