तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी विणली शाल, उपक्रमाला रविवारपर्यंत मुदतवाढ
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 17, 2024 02:32 PM2024-01-17T14:32:22+5:302024-01-17T14:33:59+5:30
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : विवेकानंद केंद्राच्या वतीने २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'धागा विणूया श्रीरामांसाठी' हा उपक्रम ...
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: विवेकानंद केंद्राच्या वतीने २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'धागा विणूया श्रीरामांसाठी' हा उपक्रम सोलापुरात सुरू आहे. वालचंद काॅलेजसमोरील पंचमुखी हनुमान मंदिरात ठेवलेल्या दोन हातमागांवर मागील १२ दिवसांमध्ये २३ हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी शाल विणली. सोलापूरकरांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून ही प्रभू रामसेवा रविवार, २१ जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी दिली आहे.
सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत दोन हातमाग सुरू आहेत. तेथे रोज सुमारे २ हजार भाविक प्रभू रामचंद्रांसाठी बनवण्यात येणाऱ्या शाल निर्मितीत सेवा देत आहेत. अधिकाधिक सोलापूरकरांनी या रामकार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पेंटप्पा गड्डम व सत्यनारायण गुर्रम यांनी केले आहे.