चोरट्याने अडीच लाख लुटले! पोलिसांत गुन्हा: बार्शी बसस्थानकावरील प्रकार
By admin | Published: May 8, 2014 10:06 PM2014-05-08T22:06:31+5:302014-05-09T00:04:39+5:30
बार्शी :
बार्शी :
बस स्थानकावरील उस्मानाबाद बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने अलीम शेख (रा. उस्मानाबाद) यांची बॅग ब्लेडने कापून त्यातील २ लाख ५० हजार रूपये चोरून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
याबाबत अलीम शेख यांनी तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादंवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हा काटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी उस्मानाबाद येथील बांधकामासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी शाखा बार्शी कडून कर्ज काढले होते व त्याप्रमाणे सोसायटीने त्या रकमेचा धनादेश काटेगाव येथील जिल्हा मध्य. सहकारी बँकेचा दिला होता़ फिर्यादीने काटेगाव येथे न जाता बार्शी शहर जि़ मध्य़ सह. बँक तेलगिरणी चौक येथे ऑनलाईनवरून जमा करण्यासाठी दिला होता.
परंतु या बँकेत फिर्यादीचे खाते नसल्यामुळे या सोसायटीचा सेवक बाळू लोखंडे यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी देण्यात आला. दुपारी जमा झाल्यानंतर चारच्या सुमारास दोघांनी ही रक्कम बँकेतून काढली. ही रक्कम फिर्यादीने जवळच्या बॅगमध्ये ठेवून गळ्यात घालून स्टँडवर आले. त्यातील बाळू लोखंडे हा वैरागला बसमधून निघून गेला व त्यानंतर फिर्यादी शेख हा उस्मानाबाद बस लागल्याने चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन ब्लेड मारून त्यातील रक्कम चोरून नेली़ पुढील तपास सपोनि अभिषेक डाके हे करत आहेत.