वीस वर्ष बहिणीनं सांभाळलं...अखेर शेजाºयांनी केले अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:02 AM2020-04-14T10:02:25+5:302020-04-14T10:06:05+5:30

लॉकडाऊन अन् गरिबीचा फटका; गोदुताई विडी घरकुल येथील श्रमिकांनी दाखवली एकी

Twenty-year-old sister handled the funeral of Sheja 3 | वीस वर्ष बहिणीनं सांभाळलं...अखेर शेजाºयांनी केले अंत्यसंस्कार 

वीस वर्ष बहिणीनं सांभाळलं...अखेर शेजाºयांनी केले अंत्यसंस्कार 

Next
ठळक मुद्देलोकवर्गणीतून दत्तात्रय गुर्रम त्यांच्यावर अंत्यविधीधार्मिक विधीनुसार सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाºयांकडून अंत्यसंस्कारघरकुल परिसरातील लोकांनीही केली मोठी मदत

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : वेळ आणि काळ हे काही सांगून येत नाहीत. एकीकडे जबरदस्त लॉक डाऊन सुरू असताना दुसरीकडे घरची गरिबी देखील त्याच तीव्रतेने परीक्षा पाहिल्यास एका बहिणीची काय अवस्था होईल, हे न सांगितलेलं बरं. 

गेल्या वीस वषार्पासून आपल्या भावाला सांभाळणाºया  बहिणीची ही व्यथा आहे. दोन वषार्पासून आजारी असलेला भाऊ एकाकी देवाघरी गेला. भावाच्या अंत्यविधीचा बाका प्रसंग तिच्यासमोर उद्भवला. भावाच्या अंत्यविधीसाठी तिने आसपास नागरिकांकडे पदर पसरला. तिची अवस्था पाहून शेजारीपाजारी मदतीला धावून आले. अवघ्या काही मिनिटात तब्बल अकरा हजार रुपये अंत्यविधीसाठी जमा झाले. मग शेजा?्यांकडूनच् अंत्यविधीची तयारी सुरू झाली. गोदुताई विडी घरकुल येथील श्रमिकांच्या माणुसकीने एका गरीब बहिणी समोरील संकट दूर झाले.

गोदुताई विडी घरकुल येथील रहिवासी दत्तात्रेय गुर्रम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. बहिण अंबाबाई सुरेश येदूर ( वय ५०, रा- गोदुताई विडी घरकुल) यांच्याकडे ते राहायचे. गेल्या काही वर्षापासून ते आजारी होते. ते विवाहित असून बायको आणि दोन मुली हे विभक्त राहतात. दत्तात्रेय हे बहीण अंबाबाई यांच्याकडेच राहायचे. अंबाबाई यांची परिस्थिती देखील गरिबीची आहे. त्यांचा मुलगा अमर हा लॉक डाऊनमुळे हैदराबाद मध्ये अडकून आहे. दत्तात्रेय यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर ते काही तासांनी आले. तोपर्यंत बहीण अंबाबाई या गोदुताई येथील नागरिकांच्या मदतीने अंत्यविधीची तयारी सुरू केली.

अंबाबाई या भाड्याच्या घरात राहत असल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. अंत्यविधीची अंत्यविधीच्या खर्चाकरिता त्यांनी आसपास नागरिकांकडे मदत मागितली त्यानंतर घरकुल येथील नागरिकांनी कोणी दहा, कुणी वीस रुपये तर कुणी पन्नास-शंभर रुपये अशी मदत देऊ केली. 
----------------
लॉक डाऊन असल्याने  नातेवाईक कोणीसुद्धा अंत्यविधीच्या तयारीला पुढे कोणी येईनात. माहिती जवा घरकुल येथील काही सार्वजनिक मंडळांना कळली त्यांनी स्व-पुढाकाराने अंत्यविधीच्या तयारीला हातभार लावला. मोजून सात ते आठ लोकांनी अंत्यविधीची तयारी करून येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये धार्मिक विधीनुसार दत्तात्रेय यांच्यावर अंत्यसंस्कार केले. श्री सिध्दिविनायक मित्र मंडळ, मातृभुमी मित्र मंडळ, श्री कृष्ण मित्र मंडळ, श्री विनायक विघ्नहरता मित्र मंडळ तसेच माकपाचे कार्यकर्ते हसन शेख व मधुकर चिल्लाळ यांच्या सहकार्याने दत्तात्रेय त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

Web Title: Twenty-year-old sister handled the funeral of Sheja 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.