वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:49 PM2019-07-26T13:49:46+5:302019-07-26T13:52:37+5:30

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली.

Twenty years later, the eyes of the brave mother and father of Kalambwadi are still visible | वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच

वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच

Next

प्रसाद पाटील

पानगाव : ‘२६ जुलै’ कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा विजय दिवस ज्या बहादूर जवानांच्या बलिदानामुळे साजरा झाला, त्यातलंच एक नाव होतं बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा़) चे सुपुत्र शहीद जवान शिपाई सुधाकर बब्रुवान जाधव यांच.. त्यांचे शौर्य अन् आठवणी या स्मारक रूपाने गावाने जपल्या आहेत.

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली. जिल्हा हळहळला. सुधाकर जाधव... एक धाडसी, तगडा मुलगा... अशी ओळख होती़ उराशी बाळगलेलं सैन्यदल भरतीचं स्वप्न साकारलं... गावातली जिल्हा परिषद शाळा, साकत प्रशाला, बार्शीचे टेक्निकल हायस्कूल, शिवाजी कॉलेज आदी ठिकाणच्या सर्वांग शिक्षणात त्याची जडणघडण झाली होती.

१९ फेब्रुवारी १९९७ रोजी पुणे येथे सुधाकर ‘मराठा एनफंट्री रेजिमेंट’मध्ये भरती झाला़ बेळगावातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये जम्मू-काश्मीरला पोस्टिंग मिळाली़ त्याच काळात कारगिलच्या युद्धाला तोंड फुटले़ सुधाकर कार्यरत असलेल्या २५ जणांच्या बहादूर तुकडीने ७ एप्रिल ते ८ डिसेंबर १९९८ काळात ‘आॅपरेशन रक्षक’ तर १३ एप्रिल ते २९ आॅगस्ट १९९९ या कालावधीत ‘आॅपरेशन विजय’ यशस्वी राबवून पाकड्यांना कंठस्नान घालत कारगिल विजय साकारला होता. 

यानंतर जम्मू-काश्मीरच्या अतिशय दुर्गम व साडेतेरा हजार फूट उंचीवरील ‘मंडी’ सेक्टरमधील पीर पंजाल पहाडीवर १३ आॅक्टोबर १९९९ पासून २५ जणांची ही तुकडी ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमेवर कार्यरत होती. खाली असणारा दारूगोळा राखण्यासाठी लावलेल्या चौकीवर ५ जून २००० रोजी पहाटे पाक ड्यांनी अचानक हमला केला. ‘बॅटल कॅज्युअल्टी’ झाली होती. जिथे प्राणवायूसाठी झगडावे लागते तिथे या हल्ल्यात पाकड्यांशी निकराचा प्रतिकार करणाºया तुकडीत सुधाकर जाधव यांच्यासह २५ जणांपैकी २२ जण कामी आले होते. उरलेल्या तिघांमार्फ त खबर पोहोचवून मदतकार्य मिळेपर्यंत पार्थिवांची अवस्था जागेवरून हलवण्यासारखी राहिली नव्हती. शेवटी सैन्यदलाने सर्व शहिदांवर लष्करी इतमामात तिथेच अंत्यसंस्कार केले. पाकड्यांचे इरादे तोडण्यासाठी सुधाकरसह २२ जणांचे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आत्मे पीर पंजाल पहाडीवरील चौकीवरच विसावले होते.

ती खंत आयुष्यभर सलत राहिली़..
- आल्या. या घटनेने वीरमाता-पित्यांचे काळीज आणखीनच पिळवटून गेले़ २० वर्षांनंतर आजही या आठवणी निघताच त्यांच्या शौर्याने ऊर भरून येतो. मात्र वीरपिता बब्रुवान जाधव आणि वीरमाता सखुबाई जाधव यांचे डोळे पाणावलेले दिसतात. शौर्य गाजविणाºया पुत्राचे पार्थिव पाहणे त्यांच्या नशिबी नव्हते, ही खंत या दोघांना सलत आहे़ या घटनेनंतर १७ वर्षांनी गावामध्ये त्यांचे स्मारक झाले़ त्यांच्या आठवणी स्मारक रूपाने जपल्या आहेत़ 

Web Title: Twenty years later, the eyes of the brave mother and father of Kalambwadi are still visible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.