डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:38 IST2025-04-20T12:37:19+5:302025-04-20T12:38:11+5:30

सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Twist in Dr. Shirish Valsangkar suicide case; Woman's name in suicide note, big revelation | डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा

डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा

सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुसाईट नोट सापडली आहे. वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे - माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली. आत्महत्येपूर्वी वळसंगकर यांनी एक सुसाईट नोटी लिहिली होती. या नोटमध्ये त्यांनी नीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

यासंदर्भात डॉ.अश्विन शिरीष वळसंगकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, हॉस्पिटल मधील एका महिला अधिकारी हिने वेळोवेळी सहकार्य करून देखील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यावर खोटे आरोप करून धमकी दिल्याचे म्हटले आहे. 

काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले

धमकी मिळाल्याने तणावाखाली होते

रुग्णालयातील सर्व व्यवहार हे कागदोपत्री हवे होते. यासाठी डॉ. वळसंगकर यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण, त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला विना कागदोपत्री पैसे स्वीकारत होती त्या महिलेला डॉक्टरांनी कामावरुन काढले होते. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती.तेव्हापासून डॉक्टर तणावाखाली होते, असे सांगण्यात येत आहे. 

डॉ. वळसंगकर शुक्रवारी रुग्णालयातून घरी परतले. रात्री ८.३० वाजता बंदूकीच्या गोळीचा आवाज आला. यावेळी कुटुंबीयांनी त्यांच्या खालीत धाव घेतली. डॉक्टर खाली कोसळले होते.  रात्री ९ वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले.  मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह ५ तज्ञ डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही, डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. 

Web Title: Twist in Dr. Shirish Valsangkar suicide case; Woman's name in suicide note, big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.