चार वर्षापासून फरार असलेले मोक्क्यातील दोन आरोपी अखेर जेरबंद; पंढरपूर पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 08:09 PM2020-11-03T20:09:50+5:302020-11-03T20:10:34+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील दरोडेखोर व मोक्का मधील पाहिजे असलेले आरोपी शत्रुघ्न अनंता काळे, भारत अनंता काळे या दोघांना जेरबंद करण्याची कारवाई केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुळुज (ता. पंढरपुर) या ठिकाणी शत्रुघ्न अनंता काळे व भारत अनंता काळे यांनी त्यांचे नातेवाईक यांस कु-हाड व दगडाने जबर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत माहीती मिळाली. या गुन्हयाचे अुनषंगाने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी तात्काळ सपेानि शंकर ओलेकर यांचे पथक फिर्याद नोंद करण्यासाठी सोलापुर येथे पाठविले.
सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात व पोलीस उपनिरीक्षक सचिन वसमाळे यांची दोन पथके तयार करुन आरेापींना जेरबंद करण्यासाठी रवाना केली. पुळुज पारधीवस्तीपासुन बाबर मळयाकडे जाण्या-या रोडवर पाठलाग करुन धारदार शस्त्रांसह आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरेापींवर पंढरपूर व कुर्डुवाडी पोलीस ठाण्यास देखील गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणी देखील खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत, तसेच महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात देखील त्यांचेवर खुनासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. यातील आरोपीचा चार वर्षांपासून शोध सुरू होता.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर याच्या नेतृत्वाखाली सपोनि आदिनाथ खरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर ओलेकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन वसमाळे, पोलीस हवालदार बापु मोरे, सुधीर शिंदे, शिवाजी पाटील, पोलीस नाईक अशोक भोसले, हनुमंत शिंदे, आबा शेंडगे, विनायक क्षीरसागर, पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंशी, गणेश बाबर, सचिन तांबिले, समाधान भराटे, शबाना मणेर यांनी केली आहे.