अडीच हजार दुचाकी, चारशेहून अधिक चारचाकी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 02:10 PM2020-10-26T14:10:08+5:302020-10-26T14:13:54+5:30
विजयादशमीचा मुहूर्त : लॉकडाऊननंतर आॅटोमोबाईल्स क्षेत्रात ४० कोटींची उलाढाल
सोलापूर : विजयादशमीचा मुहूर्त आॅटोमोबाईल्स उद्योजकांसाठी खूप चांगला ठरला आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात जवळपास अडीच हजार नवीन दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. तर चारशेपेक्षा अधिक चारचाकी नवीन वाहने आता रस्त्यावर धावतील. आॅटोमोबाईल्स उद्योगात जवळपास ४० कोटींची उलाढाल एका दिवसात झाल्याची माहिती आॅटोमोबाईल्स व्यावसायिकांकडून मिळाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चांगला व्यवसाय होईल की नाही याची साशंकता उद्योजकांमध्ये होती. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला व्यवसाय झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. रविवारी सकाळपासून शहर व ग्रामीण भागातील सर्वच आॅटोमोबाईल्स शोरूममध्ये गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू होती. युवा वर्ग स्पोर्ट्स बाईक खरेदी करताना दिसले तर महिलांनी स्कुटी गाड्या खरेदीला पसंती दिली. तसेच फॅमिली कारला सर्वाधिक पसंती होती. सेव्हन सीटर मोठ्या वाहनांना खूप कमी मागणी होती.
दरम्यान, वित्तपुरवठा संस्थांकडून विविध आॅफर्स देखील विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर होत्या. एक रुपये भरा आणि दुचाकी वाहन घेऊन जा.. फक्त पाच हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि चारचाकी गाडी घेऊन जा अशा आॅफर्स देखील बाजारात होत्या. वित्तीय संस्थांकडून तत्काळ कर्जपुरवठा होत असल्याने वाहन खरेदीला मोठा हातभार लागला.
--------
मागच्या वर्षी सारखा व्यवसाय...
अधिक माहिती देताना टीव्हीएस शोरूमचे व्यवस्थापक अंबादास भिमनपल्ली यांनी सांगितले, मागील वर्षी अडीच ते तीन हजार दुचाकी आणि पाचशे ते सहाशे चारचाकी वाहनांची विक्री झाली. यंदा कोरोना आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री झालीच नाही. वाहने खरेदी करता ग्राहक बाहेर पडले नाहीत. त्यामुळे मागील सहा महिन्यांचा जो पेंडिंग फ्लो होता तो दस?्याच्या मुहूर्तावर बाहेर पडला आणि तुफान खरेदी करू लागला. त्यामुळे मागील वर्षभरातला सर्वाधिक व्यवसाय रविवारी म्हणजे विजयादशमीच्या मुहूर्तावर झाला आहे.