पंढरपुरात पार्किंगमधील दोन दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 13:08 IST2019-05-08T13:06:55+5:302019-05-08T13:08:45+5:30
अजिंक्य अपार्टमेंटमधील घटना; पोलीसात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

पंढरपुरात पार्किंगमधील दोन दुचाकी जाळल्या
पंढरपूर : शहरातील एका अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेल्या दोन मोटरसायकली अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्या. यामुळे दोन्ही गाड्या जळून खाक झाल्याची घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
केदार हरिभाऊ मराठे (३६ वर्षे) हे मनीषा नगर येथील अजिंक्य अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांनी नेहमीप्रमाणे एम. एच. १३ सीडी २४८३ व एम. एच. १३ ए. ए, ६४१० या क्रमांकाच्या दोन मोटरसायकली सोमवारी रात्री अपार्टमेंट तळमजल्यात पार्किंग केल्या होत्या. या दोन मोटरसायकली कोणीतरी सोमवारी साडेअकरा ते मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पेटवून दिल्या. यामुळे दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
यामध्ये केदार मराठे यांचे ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केदार मराठे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.