दोन कारचा अपघात; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:24 AM2021-08-26T04:24:28+5:302021-08-26T04:24:28+5:30
सांगोला : पत्नीला माहेरी सोडून घराकडे परतणाऱ्या पतीच्या चारचाकी गाडीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने कार चालक किरकोळ ...
सांगोला : पत्नीला माहेरी सोडून घराकडे परतणाऱ्या पतीच्या चारचाकी गाडीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने कार चालक किरकोळ जखमी झाला.
हा अपघात सोमवारी सकाळी ५:३० च्या सुमारास सांगोला-मिरज रोडवर, गोकुळ हॉटेलजवळ घडला. सुहास गोरख पाटील (रा. आटपाडी, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे.
आटपाडी येथील सुहास गोरख पाटील हे पत्नीला माहेरी संगेवाडी (ता. सांगोला) येथे सोडण्यासाठी घरातून सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कारमधून (एम. एच. १०, बी.ए. ७१७४) सासरवाडीला आले होते. तेथून परत सायंकाळी ५.३० च्या सुमारास सांगोला-मिरज रस्त्याने आटपाडी घराकडे निघाले होते. हॉटेल गोकुळजवळ त्यांची कार आली असता सांगोल्याहून भरधाव येणाऱ्या कारने पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातात सुहास पाटील यांच्या पाठीला मार लागून ते जखमी झाले. याबाबत त्यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे.
---