दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांचे पाणी, प्रशासनाकडून २५ लाख बाटल्या खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:02 PM2023-06-28T12:02:28+5:302023-06-28T12:03:46+5:30
Pandharpur Wari: आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना तासन् तास रांगेत थांबावे लागते. त्यांना पाणी पिण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ विविध कंपन्यांच्या २५ लाख पाण्याच्या बाटल्या खरेदी करून, वाटपास सुरुवात केली आहे.
सोलापूर : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना तासन् तास रांगेत थांबावे लागते. त्यांना पाणी पिण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ विविध कंपन्यांच्या २५ लाख पाण्याच्या बाटल्या खरेदी करून, वाटपास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २५ जून रोजी अचानक सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. त्यावेळी, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी अशी सूचना आली. तत्काळ दखल घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासनाला वारकऱ्यांना जागेवर शुद्ध पाण्याच्या बाटल्या देण्याची व्यवस्था करा, असे आदेश दिले. वाखरी, पत्राशेड, ६५ एकर व वाळवंट या ठिकाणी रांगेत असलेल्या वारकऱ्यांना एक लिटर पाण्याच्या बाटल्या देण्यात येत आहेत.
प्रतिबाटली ८ रुपये खर्च
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध कंपन्यांच्या २५ लाख बाटल्या खरेदी केल्या आहेत.
८ रुपयेप्रमाणे २५ लाख बाटल्यांसाठी दोन कोटींचा खर्च असून, तत्काळ निधीचा तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.