जनावरे कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या दोघांना तीन दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:22+5:302021-04-08T04:22:22+5:30
बार्शी : माढा तालुक्यातून पापनस येथून एका जीपमध्ये जनावरे खचाखच बांधून जामगाव (ता. बार्शी) मार्गे ...
बार्शी : माढा तालुक्यातून पापनस येथून एका जीपमध्ये जनावरे खचाखच बांधून जामगाव (ता. बार्शी) मार्गे उस्मानाबादमधील कतलखान्याकडे घेऊन जात असताना बार्शी तालुका पोलिसांनी दोघांना पकडले होते. त्यांना बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी एस. एम. सबनीस यांनी तीन दिवसांची कोठडी सुनावली.
कलीम रफिक कुरेशी (वय २४), आफताब अकबर कुरेशी (वय १९, रा. पापनस) अशी तीन दिवस पोलीस कोठडीत गेलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी जामगाव आ. येथील एका दूध डेअरीसमोर जर्सी गायी,खोंड, लहान वासरे अशी सात जनावरे पापनस येथून एका जीपमधून उस्मानाबाद कत्तलखान्याकडे जात असल्याची माहिती प्राणीमित्र धन्यकुमार पटवा यांना समजली. त्यांनी तालुका पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक करुन जनावरे ताब्यात घेतली.