बार्शी-लातूर मार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 11:17 IST2019-05-06T10:23:05+5:302019-05-06T11:17:32+5:30
बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बार्शी-लातूर मार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
सोलापूर - बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 25 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
देगलूरकडून मुंबईकडे येडशी पांगरी मार्गे ट्रॅव्हल्स (एम एच 04 JP 771) 5 मे च्या रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास पांगरीपासून दोन किलोमीटर अंतरावर खंडसरी पाटीजवळ हा अपघात घडला. समोरून चारा घेऊन जाणारा ट्रॅक्टर (MH13/AA-6918) येडशीकडे जात असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रॅव्हल्स चालक सागर विजयकुमार रेशमी (जिल्हा बिदर) आणि एक प्रवासाचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी असलेल्या 25 प्रवाशांवर बार्शी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.