कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू, नातलगांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:53+5:302021-04-27T04:22:53+5:30

जनाबाई मधुकर बंडगर (वय ७० रा. गणेशनगर, सोलापूर), अश्रूबाई लक्ष्मण सांगळे (वय ६५, रा. चुंब) असे मयत रुग्णांची नावे ...

Two die due to lack of oxygen in cancer hospital, relatives allege | कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू, नातलगांचा आरोप

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू, नातलगांचा आरोप

Next

जनाबाई मधुकर बंडगर (वय ७० रा. गणेशनगर, सोलापूर), अश्रूबाई लक्ष्मण सांगळे (वय ६५, रा. चुंब) असे मयत रुग्णांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना हॉस्पिटलचे खजिनदार बन्सीधर शुक्ला म्हणाले की, या हॉस्पिटलमध्ये एकूण ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २३ रुग्ण ऑक्सिजन व बायपॅक व्हेंटिलेटरवर आहेत, तर १३ रुग्ण हे साधे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आमच्या इथे ऑक्सिजन कमी पडायला लागला तेव्हा आमच्या सर्व यंत्रणेने सिलिंडर करण्यासाठी धावपळ सुरू केली व गोळा केले. या रुग्णांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन हे कमी होते. बायपॅक लावूनही ऑक्सिजन वाढत नव्हता. तसेच ऑक्सिजन संपलाच असता तर बायपॅकवरील सर्व रुग्ण मरण पावायला पाहिजे होते, असे ते म्हणाले.

सर्व प्रयत्न करूनही ऑक्सिजन लेव्हल वाढत नव्हती. ऑक्सिजन सकाळी ८ वाजता आला मात्र त्याचा अन् या मृत्यूचा काही संबंध नाही.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी भेट देऊन पाहणी केली.

कोट

आमच्या रुग्ण अश्रूबाई सांगळे यांना १७ एप्रिल रोजी ॲडमिट केले होते. रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून कॅन्सर हॉस्पिटलला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होता. ऑक्सिजन तीन-चार वेळा ड्रॉप होत होता. मशीन लावल्यावरदेखील ऑक्सिजन लेव्हल वाढत नव्हती. ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्ण दगावला आहे.

- हर्षवर्धन सांगळे, चुंब रुग्णांचे नातेवाईक

----

या ठिकाणचा ऑक्सिजन पहाटे ३ वाजताच संपला आहे. मला तीन रुग्ण दगावल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासन माहिती लपविण्याचे काम करत आहे. ऑक्सिजनअभावीच हे रुग्ण दगावले आहेत. बार्शीत पुन्हा अशी घटना घडू नये.

- भाऊसाहेब आंधळकर

----

सर्व हॉस्पिटलला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. सोलापूर, चिंचोली, टेंभुर्णी येथे सिलिंडर भरण्यासाठी वाहने पाठवली आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा नाही असे म्हणता येणार नाही. कोणत्याही हॉस्पिटलने ऑक्सिजन संपण्याअगोदर चार ते आठ तास त्याची आम्हाला कल्पना द्यावी.

- हेमंत निकम, प्रांताधिकारी

Web Title: Two die due to lack of oxygen in cancer hospital, relatives allege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.