माळशिरस पोलिसांकडून दोन दारूभट्ट्या उद‌्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:54+5:302021-03-18T04:21:54+5:30

शेरखान गफार खान पठाण हा हातभट्टी दारू काढत असलेल्या ठिकाणी ९६ हजार रुपयांचे २४०० लिटर गूळमिश्रित रसायन, तीन हजार ...

Two distilleries destroyed by Malshiras police | माळशिरस पोलिसांकडून दोन दारूभट्ट्या उद‌्ध्वस्त

माळशिरस पोलिसांकडून दोन दारूभट्ट्या उद‌्ध्वस्त

Next

शेरखान गफार खान पठाण हा हातभट्टी दारू काढत असलेल्या ठिकाणी ९६ हजार रुपयांचे २४०० लिटर गूळमिश्रित रसायन, तीन हजार ६०० रुपये किमतीची ४५ लिटर हातभट्टी दारू, २४०० रुपये किमतीचे बारा लोखंडी बॅरेल असा एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल, तर दुसऱ्या ठिकाणी आरोपी फिरोज खान पठाण हा हातभट्टी दारू काढत असलेल्या ठिकाणी ६४ हजार किमतीचे १६०० लिटर गूळमिश्रित रसायन, ६०० रुपये किमतीचे प्लॅस्टिकच्या ५०० लिटरच्या दोन टाक्या, तीन लोखंडी बॅरेल असा एकूण ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुने काढून घेऊन सदरचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर, पोलीस हवालदार अनिल गायकवाड, शिवाजी परांडे, तुळा तुळशिराम गायकवाड, समाधान शेंडगे, बबन बोबडे, सोमनाथ माने, बापुसाहेब कोकाटे यांचे पथकाने केली.

Web Title: Two distilleries destroyed by Malshiras police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.