वर्दळीच्या सात रस्त्यावर तीनशे रुपयांसाठी दोन गटात हाणामारी; पंधरा जणांवर गुन्हा दाखल

By रवींद्र देशमुख | Published: August 11, 2023 12:48 PM2023-08-11T12:48:11+5:302023-08-11T12:50:01+5:30

याबाबत कॉस्टेबल मारूती चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सात रस्ता परिसरात घडली.

Two groups fight over Rs 300 in Seven Streets; A case has been registered against fifteen people | वर्दळीच्या सात रस्त्यावर तीनशे रुपयांसाठी दोन गटात हाणामारी; पंधरा जणांवर गुन्हा दाखल

वर्दळीच्या सात रस्त्यावर तीनशे रुपयांसाठी दोन गटात हाणामारी; पंधरा जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

सोलापूर - उसने घेतलेले तीनशे रुपये परत न दिल्याने दोन गटात तुफान हणामारी झाली. यात दोन्ही गटातील पंधरा जणांवर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कॉस्टेबल मारूती चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सात रस्ता परिसरात घडली.

गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सात रस्ता परिसरात पैसे देणे घेण्यावरून प्रवीण संगमेश्वर कट्टिमणी ( वय १९, रा. लष्कर) याचे व साईनाथ अंबादास जाधव ( वय १९, रा. सेटलमेंट) यांच्या दोघात वाद झाला. वाद होताच दोघांनी आपपल्या मित्रांना बोलावून घेतले. यावेळी दोन्ही गटात तुफान हणामारी सुरू झाली. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून लगेच घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी पोलिसांनी प्रवीण कट्टमणी, अजय महादेव मोटे ( वय ३०, रा. लष्कर), विजय महादेव मोटे ( वय २८, रा. लष्कर) , साईनाथ जाधव, साहिल सुनील गायकवाड ( वय १९, रा. शहा नगर, लिमयेवाडी), रोहित सुनील बनसोडे ( वय २०, रा. दोन नंबर झोपडपट्टी) यांना ताब्यात घेतले. शिवाय यावेळी प्रतिक, ओंकार व ५ ते ७ इसम हे पळून गेले. याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास हवालदार चव्हाण करत आहेत.

Web Title: Two groups fight over Rs 300 in Seven Streets; A case has been registered against fifteen people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.