लोकसहभागातून तयार केला दोन किलोमीटर रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:27 AM2021-09-12T04:27:23+5:302021-09-12T04:27:23+5:30
बोहाळी (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून २ कि.मी. मुरुमीकरणाचा रस्ता तयार केला आहे. याबद्दल प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
बोहाळी (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून २ कि.मी. मुरुमीकरणाचा रस्ता तयार केला आहे. याबद्दल प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेल्हेकरांनी शेतकऱ्यांना वीज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतात पोहोचण्यासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून विविध योजनांच्या माध्यमातून शिवरस्ते, पाणंद रस्ते या योजनेत लोकसहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी नायब तहसीलदार मनोज श्रोत्री व बोहाळीचे शेतकरी उपस्थित होते.
----
यांनी दिले योगदान
लोकसहभागातून बोहाळी (ता. पंढरपूर) येथील रवींद्र कुलकर्णी, दिलीप गायकवाड, साहेबराव जाधव, उमेश नलावडे या शेतकऱ्यांनी एकत्रित येत अनिल बाबर, पिंटू खुळे, अमोल गायकवाड या शेतकऱ्यांसाठी लोकसहभागातून मुरुमीकरण करून रस्ता तयार केला आहे. हा रस्ता इतर शेतकऱ्यांना आदर्शवत उदाहरण असल्याचे बेल्हेकर यांनी सांगितले.
----