श्रावणी पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत दोन लाख भाविक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:28 PM2022-08-08T14:28:16+5:302022-08-08T14:28:33+5:30
विठू नामाचा जप करीत, खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन लाखो भाविकांनी पुत्रदा एकादशी निमित्त लाडक्या श्री विठूरायाचे दर्शन घेतले.
विठ्ठल खेळगी
पंढरपूर : आषाढी यात्रेनंतर श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पुत्रदा एकादशी असल्याने दोन लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात शहरातील सामाजिक संघटनांनी शाबुखिचडी, फळांचे वाटप केले.
विठू नामाचा जप करीत, खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन लाखो भाविकांनी पुत्रदा एकादशी निमित्त लाडक्या श्री विठूरायाचे दर्शन घेतले. सावळ्या विठूरायाचे मनमोहक रूप पाहात दर्शन झाल्याचे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
पहाटेपासून चंद्रभागा नदीवर भाविकांची स्नान करण्यासाठी गर्दी होती. सकाळी श्रीज्ञानेश्वर मंडपापासून दर्शन रांग गोपाळपूर पत्राशेडपर्यंत पोहचली होती. एसटी बस, रेल्वे, खाजगी वाहने, पायी चालत पंढरीत भाविक दाखल झाले. प्रदक्षिणा मार्ग, वाळवंट, मंदिर परिसर, चौफाळा परिसर, नाथचौक, भजनदास चौक, स्टेशन रोड परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.