पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना

By Appasaheb.patil | Published: November 11, 2024 04:25 PM2024-11-11T16:25:38+5:302024-11-11T16:26:06+5:30

दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री यांना असतो. मात्र यंदा आचारसंहिता असल्याने उपमुख्यमंत्र्यांऐवजी महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना मिळाला असल्याचे मंदिर समितीने सांगितले.

Two lakh devotees entered Pandharpur; Honor of the Government Mahapuja to the Divisional Commissioner | पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना

पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना

सोलापूर : कार्तिक शुद्ध एकादशी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दोन लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याची माहिती पेालिसांनी दिली. दरम्यान, यंदा कार्तिक आषाढी यात्रेतील शासकीय महापूजेचा मान पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना मिळाला आहे. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री यांना असतो. मात्र यंदा आचारसंहिता असल्याने उपमुख्यमंत्र्यांऐवजी महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना मिळाला असल्याचे मंदिर समितीने सांगितले. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहेत. पालख्यांचे आगमन होत आहे, ६५ एकर परिसरात वारकरी मोठया संख्येने दिसून येत आहेत. पंढरपूर शहरात गर्दी वाढत असून विठ्ठलाची दर्शनरांग पत्राशेडपर्यंत गेली आहे. 

कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी  १ हजार ६२६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.   वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या आदेशान्वये  जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी  १३ ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

Web Title: Two lakh devotees entered Pandharpur; Honor of the Government Mahapuja to the Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.