कोन्हेरीत जुगार अड्डयावरील धाडीत दोन लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:23 AM2021-05-12T04:23:03+5:302021-05-12T04:23:03+5:30
मोहोळ : कोन्हेरी परिसरात सारोळे रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्डयावर मोहोळ पोलिसानी धाड टाकून ...
मोहोळ : कोन्हेरी परिसरात सारोळे रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्डयावर मोहोळ पोलिसानी धाड टाकून चार मोटार सायकलीसह १ लाख ९१ हजार ७६० रुपयाचा ऐवज ताब्यात घेतला.
११ मे रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोन्हेरी परिसरात सारोळे जाणाऱ्या रोडजवळ लिंबाच्या झाडाखाली ५२ पानी पत्याचा खेळ सुरु होता. याची मोहोळ पोलिसांना माहिती मिळाली. लागलीच मोहोळ पोलिसांनी मंगळवार दुपारी २.१५ चे दरम्यान धाड टाकली.
या कारवाईत संजय दत्तात्रय शेळके (५०), समीर अंकुश गाडे वय (२९), धनाजी मछिद्र डोळे (४३), लक्ष्मण शिवाजी सरक (३४ वर्षे ), शिवाजी ब्रम्हदेव गाडे (६०),समाधान परमेश्वर सोनवणे (वय ४०), सत्यवान प्रभु कांबळे ( ५० वर्षे सर्व रा. कोन्हेरी ता. मोहोळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १७६० रोख रक्कम व चार मोटार सायकली असा ऐवज जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे , हवालदार मुन कॉ मुन्ना बाबर , प्रवीण साठे घोळवे यांनी ही कारवाई केली .