रेल्वेतील ५२९ फुकट्या प्रवाशांकडून दोन लाखांचा दंड वसूल
By appasaheb.patil | Published: February 15, 2019 01:49 PM2019-02-15T13:49:50+5:302019-02-15T13:52:03+5:30
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाºया मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीमध्ये विनातिकीट प्रवास करणाºया ५२९ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ...
सोलापूर : सोलापूररेल्वे स्थानकावरून धावणाºया मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीमध्ये विनातिकीट प्रवास करणाºया ५२९ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार ६७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सोलापूर विभागात १३ फेबु्रवारी रोजी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांच्या नेतृत्वाखाली व मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत २४ मेल एक्स्पे्रस व पॅसेंजर गाड्यांची तपासणी करण्यात आली़ यात विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी, अनियमित प्रवासी व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, अस्वच्छता पसरविणारे प्रवासी व धूम्रपान करणाºया ५२० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार ६७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वेतून विनातिकीट प्रवास करीत असल्याच्या बाबी अनेक वेळा समोर आल्या होत्या़ विनातिकीट प्रवास करून रेल्वे प्रशासनाचे नुकसान करणाºया प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाले होते़ त्यानुसार मंडलातील सोलापूर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे़ तिकीट न काढणाºया प्रवाशांसह इतर गैरकृत्य करणाºया प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
सुरक्षा बलातील कर्मचाºयांची घेतली मदत
- सोलापूर मंडलात राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत विशेष सुरक्षा बलातील दहा कर्मचाºयांनीही सहभाग नोंदविला होता़ याशिवाय तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार यांच्यासोबत ४२ तिकीट तपासणी कर्मचारी व अधिकारी यांनी मोहीम यशस्वी केली़ यासाठी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे व मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांचे सहकार्य लाभले़
रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा़ शिवाय कोणत्याही प्रकारचे नुकसान रेल्वे प्रशासनाचे होणार नाही, याची काळजी घ्यावी़ सातत्याने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे़ तरी प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे़
- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर मंडल.