कोल्हापुरात नाकाबंदी करुन लूटमारीतील दोघे माळशिरस पोलिसांच्या तावडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:22+5:302021-08-20T04:27:22+5:30

पिलीव घाटात मोटारसायकल अडवून लूटमार झाल्याची घटना १३ ऑगस्टला घडली होती. याबाबतची फिर्याद विशाल बाळासाहेब फाळके (रा. मळोली, ...

Two Malshiras police arrested for looting after blockade in Kolhapur | कोल्हापुरात नाकाबंदी करुन लूटमारीतील दोघे माळशिरस पोलिसांच्या तावडीत

कोल्हापुरात नाकाबंदी करुन लूटमारीतील दोघे माळशिरस पोलिसांच्या तावडीत

Next

पिलीव घाटात मोटारसायकल अडवून लूटमार झाल्याची घटना १३ ऑगस्टला घडली होती. याबाबतची फिर्याद विशाल बाळासाहेब फाळके (रा. मळोली, ता. माळशिरस) यांनी दिली होती. याबाबत पोलिसांची तपास पथके विविध ठिकाणी रवाना केली होती. यात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून आरोपीला बेड्या ठोकल्या, तर त्याच्या साथीदाराला वेळापुरातून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, पोलीस कर्मचारी राहुल वाघ, मारोती शिंदे, दत्ता खरात, सोमनाथ माने, सायबर शाखेचे अन्वर आतार यांच्यासह पोलीस पथक सहभागी झाले होते.

असा लागला छडा

आसपासच्या गाव हद्दीतील गोपनीय माहिती, खबऱ्यामार्फत पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचले. मात्र, आरोपी गोव्याला असल्याचा सुगावा लागला. पोलीस गोव्याकडे जात असतानाच तो आरोपी परत माघारी येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे रस्त्यातच आजरा (जि. कोल्हापूर) पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी सुरू केली. आरोपीच्या फोटोवरून सुमारे दोन-तीन तासांची नाकाबंदी केल्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्या साथीदाराला वेळापूर येथून अटक केली. त्यांनी केलेल्या इतर चोऱ्यांचा उलगडा होत असून, याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके करीत आहेत.

Web Title: Two Malshiras police arrested for looting after blockade in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.