सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद

By विलास जळकोटकर | Published: November 30, 2023 07:05 PM2023-11-30T19:05:09+5:302023-11-30T19:05:21+5:30

कर्नाटकात असल्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बीदर येथे जाऊन पकडले.

two man who stole bangles from a goldsmith shop went to Karnataka and was jailed | सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद

सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद

सोलापूर : नेहमीच गजबलेल्या असणाऱ्या शहरातील सराफ दुकानातून दिवसाढवळ्या दागिने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा चोरट्यांनी सोन्याच्या चार बांगड्या चोरल्या होत्या. हे आरोपी कर्नाटकात असल्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बीदर येथे जाऊन पकडले. त्याच्याकडून ४०. ४५० ग्रॅम वजनाचा २ लाख ३२ हजार रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यातर आला. त्याच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे.

सराफ गल्ली झालेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व सहकाऱ्यांनी अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या गुन्हे कार्यप्रणालीचा अभ्यास करताना खबऱ्याकडून संबंधित आरोपी कर्नाटकातील बीदर येथे असल्याचे समजले. त्यानंतर पथकातील सपोनि जीवन निरगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकातील बीदर येथे जाऊन तेथील पोलिसांच्या मदतीने इराणी गल्लीत जहिद उर्फ हैदरअली उर्फ काला कौवा जावेदअली इराणी याला चिद्री बीदर रोड येथून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्यानं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सराफ दुकानातील चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीतल्या ४.७५० ग्रॅम वजनाच्या २ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्यांच्या बांगड्या काढून दिल्या. हा गुन्हा जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आरोपील त्यांच्याकडे ताब्यात दिले आहे. यातील आरोपीचा साथीदार रजा हुसेन उर्फ रजिया अफसर अली इराणी याचा शोध सुरु आहे.
 
अन्य दोन गुन्ह्यांचाही छडा
शहरात दुचाकीचोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सपोनि विजय पाटील यांच्या पथकाची मोहीम सुरु असताना २५ नोव्हेंबर रोजी अदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी (वय- २८, रा. बिलाल नगर, वजापूर रोड, सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी व लॅपटॉप जप्त करण्यात आला. हा आरोपी विजापूर नाका पोलीस ठाण्यास चोरीतील गुन्ह्यासाठी हवा होता. सराफ दुकानातील चोरीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेच्या पथकाकडून ३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
 

Web Title: two man who stole bangles from a goldsmith shop went to Karnataka and was jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.