आचारसंहिता भंगाचे आणखी दोन गुन्हे,यलगुलवारसह दोन चालकांचा समावेश
By रवींद्र देशमुख | Published: May 6, 2024 08:32 PM2024-05-06T20:32:25+5:302024-05-06T20:32:37+5:30
रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास कर्तव्य बजावणारे पोलीस करण चंद्रकांत भोसले यांना सात रस्ता परिसरात वाहनाच्या बोनेटवर बसपाच्या पक्षाचा झेंडा आढळून आल्याने आचारसंहिता भंगची तक्रार केल्याने गुन्हा नोंदला.
रवींद्र देशमुख / सोलापूर
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नियमाचे पालन न केल्याबद्दल आचारसंहिता भंगाचे आणखी दोन गुन्हे सदर बझार पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले. यात काँग्रेसच्या उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी प्रकाश यलगुलवारसह , आप्पा आबा लोकरे (वाहनचालक रा. अमृतनगर सोलापूर), रिक्षाचालकाचा समावेश आहे.
रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास कर्तव्य बजावणारे पोलीस करण चंद्रकांत भोसले यांना सात रस्ता परिसरात वाहनाच्या बोनेटवर बसपाच्या पक्षाचा झेंडा आढळून आल्याने आचारसंहिता भंगची तक्रार केल्याने गुन्हा नोंदला.
सात रस्ता परिसरात फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेकाद्वारे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा बॅनर लावून प्रचार करताना पोलीस बाळू जाधव यांच्या निदर्शना आले. त्यांनी निवडणूक प्रतिनिधी प्रकाश यलगुलवार, रिक्षाचालक यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला गेला. दोन्ही गुन्हे सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत. तपास पोलीस नाईक माडे, हवालदार देंडे करीत आहेत.