बनावट रेमडेसिविर विक्री प्रकरणात आणखी दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:24+5:302021-05-21T04:23:24+5:30
बार्शी : ५० हजारात दोन बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विकून त्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांनी ...
बार्शी : ५० हजारात दोन बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विकून त्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांनी आणखी दोघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
वैद्यकीय प्रतिनिधी (एम.आर.) अशपाक नजीर निलगुंडे (२२), सादिक सलीम हिरोली (२३, दोघे रा.मजरेवाडी, सोलापूर) अशी पोलीस कोठडीतील दोघांची नावे आहेत. या प्रकरणात तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे यांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणात विकास काशीनाथ जाधवर (रा.बार्शी) हा संशयित आरोपी पोलिसांच्या हाती अद्याप लागलेला नाही.
१२ मे रोजी जिल्हा अन्न औषध प्रशासनाने शहर पोलिसात तक्रार देताच बनावट रेमडेसिविर हे कोणाकडून आणले याचा तपास करताना सोलापूर येथून एका औषध विक्रेता मालकाकडून ती एस.टी. पार्सलच्या माध्यमातून वैभव शिराळ यांना दिल्याचे उघड झाले आहे. औषधाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली असता जप्त केलेले रेमडेसिविर हे बनावट असल्याचे निदर्शनास आले.