बार्शीत दोन नवीन कोविड सेंटर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:23 AM2021-04-04T04:23:05+5:302021-04-04T04:23:05+5:30
डॉ. ढेले यांनी नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल आणि जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. ...
डॉ. ढेले यांनी नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल आणि जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली. बैठकीत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल बोपलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, डॉ. अनिल माळी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, आयएमएचे बार्शी सचिव डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. तरंग शहा उपस्थित होते.
याबैठकीत खासगी दवाखान्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे, कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नियमानुसार देणे याबाबत चर्चा झाली. डॉ. तरंग शहा यांनी १५ ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी तयारी दाखवली. डॉ रोहन पाटील यांनी देखील पाटील हॉस्पिटलमध्ये २० ऑक्सिजन बेडसह डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्याचे मान्य करून लगेच सुरू देखील केले. नर्गिस दत्त हॉस्पिटलमध्ये पहिले ३५ बेड्स आहेत त्यात १५ ची वाढ करून ५० ऑक्सिजन बेड सुरु करण्याचे प्रशासनाने मान्य केले. हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर चाचणी करणारी मशीनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगितले.
डॉ. ढेले यांनी कोठारी आणि पाटील पैथॉलॉजी लॅबोरेटरीस भेट देऊन रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्याबाबतची प्रक्रिया, माहिती संकलित करण्याची पध्दती याबाबतची माहिती दिली.
असे वाढणार १०५ बेड्स
बार्शीत सध्या विविध कोविड हॉस्पिटलमध्ये २२७ बेडची सुविधा आहेत. त्यात या १०५ ची भर पडणार आहे. यात शहा हॉस्पिटल आणि पाटील हॉस्पिटलचे मिळून ३५, मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलमध्ये सध्याचे ७५ व नवीन २५ ,कॅन्सरला ३५ अधिक १५, डॉ अंधारे यांचे सुश्रूतमध्ये जुने ५० अधिक नवीन ३० असे १०५ बेड्स वाढणार असल्याचे डॉ. संतोष गायकवाड यांनी सांगितले.