मशिनमध्ये तरुणाची दोन बोटे गेली अन्‌ रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 06:49 PM2022-08-30T18:49:39+5:302022-08-30T18:51:04+5:30

यातील जखमी अरविंद सत्यनारायण गट्टा हा न्यू सुनीलनगरमध्ये वास्तव्यवास आहे

Two of the young man's fingers were lost in the machine and blood splattered in solapur company | मशिनमध्ये तरुणाची दोन बोटे गेली अन्‌ रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या

मशिनमध्ये तरुणाची दोन बोटे गेली अन्‌ रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या

Next

विलास जळकोटकर 

सोलापूर : अक्कलकोट रोडवरील प्लास्टिक कंपनीमध्ये काम करताना अचानक तरुणाची दोन बोटे मशिनमध्ये अडकली आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अरविंद सत्यनारायण गट्टा (वय- ३०) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. 

यातील जखमी अरविंद सत्यनारायण गट्टा हा न्यू सुनीलनगरमध्ये वास्तव्यवास आहे. अर्थार्जनासाठी तो अक्कलकोट रोडवरील भारत प्लॉस्टिक कंपनीमध्ये कामाला जातो. नेहमीप्रमाणे मंगळवारी तो कामावर गेला. सकाळी ११ च्या सुमारास काम करताना अचानक त्याच्या उजव्या हाताची दोन बोटे मशिनमध्ये गेली. काही कळण्याच्या अगोदरच बोटं रक्ताळली. चिळकांड्या उडाल्या. कामावरचे लोक जमले. एकच गोंधळ उडाला. तातडीने त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उ्‌चारणासाठी दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद झाली आहे. 
 

Web Title: Two of the young man's fingers were lost in the machine and blood splattered in solapur company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.