महापालिकेच्या आणखी दोन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; संपर्कातील लोक व्कारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 07:30 PM2020-05-31T19:30:45+5:302020-05-31T19:37:58+5:30

सोलापूर महापालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यामध्ये अस्वस्थता; कोरोना पॉझीटिव्ह शिपाई कंट्रोल रुममध्येही फिरत होता !

Two other municipal officials contracted corona; People in contact became quarantined | महापालिकेच्या आणखी दोन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; संपर्कातील लोक व्कारंटाइन

महापालिकेच्या आणखी दोन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; संपर्कातील लोक व्कारंटाइन

Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटलमधील कोवीड १९ कंट्रोल रुमधील एक वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय भांडारमधील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले.


या अधिकाऱ्यांचा संपर्कातील लोकांना व्कारंटाइन करण्यात येत आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागातील प्रमुख अधिकारी, दोन आशा वर्कर आणि एका प्रसुतीगृहात कार्यरत असलेल्या शिपायाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्था होती. कोरोना पॉझीटिव्ह शिपाई कंट्रोल रुममध्येही फिरत होता. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या लोकांचे स्वॅब घेण्यात आले.

या कंट्रोल रुममधील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कंट्रोल रुमच्या माध्यमातून शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांवर नजर ठेवली जात आहे. या प्रतिबंधीत क्षेत्रांची माहिती संकलित करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे. वैद्यकीय भांडारमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आली.

Web Title: Two other municipal officials contracted corona; People in contact became quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.