बस-बाईकच्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू

By admin | Published: April 26, 2017 01:08 PM2017-04-26T13:08:12+5:302017-04-26T13:08:12+5:30

वाखरी येथील पंढरपूर-सातारा मार्गावर राजीवनगर येथे बस आणि बाईकचा भीषण अपघात झाला. यात बाईकवरील 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

Two people die in a bus crash | बस-बाईकच्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू

बस-बाईकच्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू

Next

 ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 26 - वाखरी येथील पंढरपूर-सातारा मार्गावर राजीवनगर येथे बस आणि बाईकचा भीषण अपघात झाला. यात बाईकवरील 2 जणांचा मृत्यू झाला आहे.  बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 
 
सोमनाथ आणि विशाल इंगोले अशी मृतांची नावं आहेत. सोमनाथ आणि विशाल यांच्या बाईकला साता-याहून येणा-या बसनं जोरदार धडक दिली. 
 
जे.सी.बी. मशीनला ओव्हर टेक करुन पुढे जाण्याच्या प्रयत्नात एसटी बसने समोर येणा-या बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील सोमनाथ व विजय गंभीर जखमी झाले. यानंतर दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

Web Title: Two people die in a bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.