दुचाकीवरून जाताना समोर बसलेल्या मुलानं अचानक ब्रेक दाबल्याने अपघात, दोघे जखमी

By विलास जळकोटकर | Published: May 28, 2024 07:10 PM2024-05-28T19:10:27+5:302024-05-28T19:10:33+5:30

जखमी दोघांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Two people were injured in the accident when the boy sitting in front suddenly pressed the brake while riding the bike | दुचाकीवरून जाताना समोर बसलेल्या मुलानं अचानक ब्रेक दाबल्याने अपघात, दोघे जखमी

दुचाकीवरून जाताना समोर बसलेल्या मुलानं अचानक ब्रेक दाबल्याने अपघात, दोघे जखमी

सोलापूर : कनार्टकातील मरगुर गावाकडे दुचाकीवरुन ट्रिपलसीट निघालेल्यांपैकी समोर बसलेल्या लहान मुलानं अचानक ब्रेक दाबल्यानं रोडवर पडून दोघे जखमी झाले. पावणेचारच्या सुमारास नांदणी पुलाजवळ ही घटना घडली. जखमी दोघांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अनस अल्लाबक्ष जातगार (वय- ६), गुलाबबी सैफन जातगार (वय ५८, रा. मरगूर, ता. चडचण, जि. विजापूर, कर्नाटक) असे जखमी दोघांची नावे आहेत. यातील जखमी सोलापुरातून आयटीआय चौक येथून मरगुर गावाकडे दुचाकीवरुन ट्रिपलसीट निघाले होते. समोर सहा वर्षाचा अनस बसला होता.

अचानक त्याच्याकडून ब्रेक दाबलं गेल्यानं दुचाकीवरुन सर्वजण रोडवर पडले. यात अनस याच्या तोंडास खचरटले. गुलाबबी यांना सर्वांगास जखम झाली. नातेवाईक महेबूब जातगार यांनी त्यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

... जीवघेणा अपघात घडला असता
दुचाकीस्वारासह तिघेही रोडवर पडल्यानंतर सुदैवाने याचवेळी येणारे-जाणारे वाहन नव्हते अन्यथा जीवघेणा अपघात घडला असता अशा भावना यावेळी नातलगांकडून चर्चिल्या गेल्या.

Web Title: Two people were injured in the accident when the boy sitting in front suddenly pressed the brake while riding the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात