लाचप्रकरणी सोलापुरातील दोघां पोलिसांवर गुन्हा दाखल
By appasaheb.patil | Published: September 25, 2019 07:53 PM2019-09-25T19:53:16+5:302019-09-25T19:54:25+5:30
सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सोलापूर : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजाराची मागणी करून तीन हजार रूपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी दोघांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई सोलापूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
दरम्यान, संतोष व्हन्नप्पा राठोड (वय ४३ पोलीस नाईक-७०६) व महेश कालिदास दराडे (वय ३५ पोना ११८३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघां पोलिसांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्याविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक पोलीस नाईक संतोष राठोड व महेश दराडे यांनी ५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ तडजोडीअंती ३ हजार रूपयाची लाच स्वीकारताना पोलीस नाईक दराडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी दोघांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळा कारवाईत पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप बोरस्ते याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल सिध्दाराम देशमुख, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली़