प्रशांत परिचारक यांचे कोरोना टेस्टचे दोन अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:38+5:302021-03-10T04:23:38+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मी पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात २६ फेब्रुवारीला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. याचा अहवाल २८ रोजी पॉझिटिव्ह आल्याने मी ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मी पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात २६ फेब्रुवारीला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. याचा अहवाल २८ रोजी पॉझिटिव्ह आल्याने मी स्वतः विलगीकरणात गेलो. यानंतर माझा मुलगा जो एमडी (डॉक्टर)आहे, त्याने रॅपिड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोनवेळा चाचणी केली, ती निगेटिव्ह आली. या काळात आपण कारखान्यावर विलगीकरणात राहिलो. यानंतर पुन्हा आर.टी.पी.सी.आर. चाचणी पुण्यात केली, तीही निगेटिव्ह आली असल्याचे आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
या दरम्यान डॉ. दाते यांना सर्व बाबी सांगितल्या. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशीही बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार ५ टक्के चाचण्यांचे निकाल चुकू शकतात. तीनवेळा चाचण्या करून अधिवेशनाला आलो, याबाबत सभापतींना माहिती दिली. आज आमदार शशिकांत शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला, त्यांनाही माझ्या या चाचण्यांबाबत बोललो होतो. काल (दि.८ मार्च) पुन्हा मी चाचणी केली आहे, ती पण निगेटिव्ह आली आहे.
वास्तविक पाहता मीच शासकीय यंत्रणेबाबत या चाचण्यांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करायला हवा होता. मात्र, त्यात त्यांची काय चूक? काहीवेळा फाॅल्स पाॅझिटिव्ह; फाॅल्स निगेटिव्ह होऊ शकते, याची कल्पना आहे. मी काहीही लपविलेले नाही, मी माझे चाचणी अहवाल पटलावर ठेवायला तयार आहे. यामुळे कोणाचाही गैरसमज नसावा, असेही आवाहनही आ. प्रशांत परिचारक यांनी केले आहे.